शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

शिवशाहीबाबत प्रवाशांच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 03:16 IST

शिवशाही एसटी बसेस रायगड एसटी विभागात सुरू झाल्यापासून, शिवशाही एसटी बसचा जिल्ह्यातील पाचवा अपघात असल्याची माहिती रायगड(रामवाडी) एसटी विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली

जयंत धुळप अलिबाग : शिवशाही एसटी बसेस रायगड एसटी विभागात सुरू झाल्यापासून, शिवशाही एसटी बसचा जिल्ह्यातील पाचवा अपघात असल्याची माहिती रायगड(रामवाडी) एसटी विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली आहे. दरम्यान, शिवशाही एसटी बसेसच्या बाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी आहेत. मुळात या शिवशाही एसटी बसेसवरील चालक हे प्रसन्न ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीचे चालक असल्याने, त्यांचा त्याच बसवरील एसटी महामंडळाच्या वाहकाबरोबर अपेक्षित समन्वय नसतो, त्याचा विपरीत परिणाम प्रवाशांना भोगावा लागतो आहे. गुरूवारी घडलेल्या अपघातामुळे हे पुन्हा सिद्ध झाले आहे.गुरूवारी सकाळी अलिबागपासून सहा किमी अंतरावरील कार्लेखिंड घाटात अत्यंत वेगातील मुरुड-स्वारगेट या शिवशाही बसने तिच्या पुढे जाणाऱ्या मिनीडोर रिक्षाला धोकादायक परिस्थितीत ओव्हरटेक केले. तसेच समोरून येणाºया पनवेल-अलिबाग एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात या तीनही वाहनांतील एकूण ८७ प्रवासी जखमी झाले. यामध्ये ४४ पुरुष तर ४३ स्त्री प्रवासी आणि एका समावेश आहे. या सर्व जखमी प्रवाशांना येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पनवेल-अलिबाग एसटी बसचे चालक के.एस.लहाने या अपघातात गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना मुंबईतील जे.जे.रुग्णालयात उपचाराकरिता रवाना करण्यात आले असल्याची माहिती रायगड वाहतूक पोलीस शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे.कार्लेखिंड घाटात मुरुड येथून स्वारगेट(पुणे) येथे जाणारी शिवशाही बस क्र.एम.एच.१४-जीडी-८७३९ हिने त्यापुढे जाणाºया मिनीडोर रिक्षा क्र. एम.एच.०६-जे-२८९८ हिस भरधाव वेगात ओव्हरटेक करीत असताना, समोरून येणाºया पनवेल-अलिबाग एसटी बस क्र.एम.एच.-१४-बीटी-१८७७ हिस समोरूनच जोरदार धडक दिल्याने हा गंभीर अपघात झाला.या अपघातास कारण ठरलेला शिवशाही एसटी बसवरील प्रसन्न ट्रॅव्हल्स कंपनीचा खासगी चालक सय्यद तोहर निजाम याच्याविरुद्ध अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.शिवशाही एसटी बसचे चालक बसेस बेदरकारपणे चालवितात. याबाबत प्रवाशांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु त्याची दखल घेतली जात नाही, अशी तक्रार प्रवासी बाळाराम पाटील यांनी केली आहे. शिवशाही एसटी बसमध्ये उभ्याने प्रवास करणे अपेक्षित नाही तरी सुद्धा अतिरिक्त प्रवासी घेवून त्यांना उभ्याने प्रवास करण्यास भाग पाडले जाते, याबाबत आरक्षणासह बसून प्रवास करणाºया प्रवाशांनी तक्रारी केल्या तरी त्याची दखल घेतली जात नसल्याचे सविता देशमाने या महिला प्रवाशाने सांगितले. एकंदरीत घटना पाहता शिवशाही बसेसबाबत लोकांचा रोष वाढत आहे.