शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जासई उड्डाणपुलाचा भाग कोसळला; उरणजवळील घटनेत एका कामगाराचा मृत्यू; तर सहा जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 07:32 IST

जेएनपीटी परिसरात जेएनपीटीच्या माध्यमातून तीन हजार कोटी रुपये खर्चून सात उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : जेएनपीटीच्या तीन हजार कोटी खर्च करून उभारण्यात येत असलेल्या सातपैकी जासई उड्डाणपुलावरील २० क्रमांकाचा पीयर कॅपचा स्लॅब भरताना बूम प्लेअरला क्रेनचा धक्का लागून परात अचानक कोसळली. या घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी सव्वाचार वाजता घडली. 

या घटनेतील जखमींवर जेएनपीटी व एमजीएम इस्पितळात उपचार सुरु आहेत. पोलिसांना या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती उरण तहसीलदार  भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. मोहम्मद मुजम्मिल फाजरुंम रहमाल आलम (वय २०) असे मृताचे नाव आहे. तर, जखमींमध्ये अशोक लाल भाऊजी सुरेन (१८), दुलाल रामदास मुरमु (१८),  चंदन कुमार मड्या (२०), अमरकांत भोला मंडल (१९), समीर गायन मुरम (२०), नागेन शिबराज मुर्मु (२०), ओम प्रकाश बानू भारद्वाज (४८)  यांचा समावेश आहे. 

जेएनपीटी परिसरात जेएनपीटीच्या माध्यमातून तीन हजार कोटी रुपये खर्चून सात उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. त्यापैकी दास्तान ते शंकर मंदिरदरम्यान दीड किलोमीटर लांबीच्या जासई उड्डाणपुलाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. नॅशनल हायवे ॲथॉरिटीच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या ५० पीयर कॅपपैकी २० क्रमांकाच्या पीयर कॅपचे काम मंगळवारी (२) सुरू होते. 

१४ मीटर उंचीवर पीयर कॅपच्या स्लॅब भरण्याच्या कामासाठी परातीही बांधल्या होत्या. त्यावर १०-१५ कामगार काम करत होते. अचानक परातीला स्लॅब भरणारी बूम प्लेअरचा धक्का लागला.  या धक्क्याने परात  स्लॅब, स्टील, मलब्यासह खाली कोसळला. या स्लॅब, स्टील, मलब्यात एक कामगार जागीच ठार झाला. तर सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जेएनपीटी आणि एमजीएम रुग्णालयात दाखल केल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, एसीपी सचिन सावंत, उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

अपघाताच्या चौकशीचे आदेशमलबा बाजूला करण्याच्या कामासाठी जेएनपीटी गव्हाणफाटादरम्यान सुमारे  दोन तास वाहतूक बंद करण्यात आली होती. उरण तहसीलदारांनी या अपघाताची चौकशीचे आदेश दिले आहेत.परात कोसळल्याने दुर्घटनापीयर कॅप भरताना परातीला बूम प्लेअरचा क्रेनचा धक्का लागून स्टील, मलब्यासह खाली परातीसह अचानक कोसळून अपघात झाल्याची माहिती ठेकेदार जे. कुमार कंपनीचे सहायक अभियंता पीराजी कांबळे यांनी दिली.