शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

करवाढ नसलेला पनवेल महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर; विकासासाठी ३,८७३ कोटींचे 'बजेट'

By वैभव गायकर | Updated: February 25, 2025 18:45 IST

करवाढ नसल्याने पनवेलकरांना दिलासा

वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: नवव्या वर्षात पदार्पण केलेल्या पनवेल महानगरपालिका विकासाच्या एका वेगळ्या वळणावर आहे. मालमत्ता करावरून निर्माण झालेला संभ्रमामुळे मालमत्ता कर वसुलीवर त्याचा परिणाम झाला असला तरी जीएसटी अनुदान तसेच इतर अनुदानांमुळे पालिकेची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. सन 2024-25 चा सुधारित व सन 2025 -26 चा मूळ 3,873 कोटी 86 लाखांचा अर्थसंकल्प आयुक्त मंगेश चितळे यांनी आज सादर केला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे यांनी प्रशासकीय स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्याकडे हा अर्थसंकल्प सुपूर्द केला. कोणत्याही प्रकारची करवाढ नसल्याने हा अर्थसंकल्प पनवेलकरांना दिलासा देणारा ठरला आहे.

3991 कोटी 99 लाखांचे मागील वर्षाचे अर्थसंकल्प होते. त्यात काही प्रमाणात घट झाली असून मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट्य पालिकेला गाठता आलेले नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात 1037 आरंभीची शिल्लकिचा समावेश आहे. याव्यतिरिक्त मनपा कर 1317 कोटी युडीसीपीआर व विकास शुल्क अंतर्गत वसुली 115 कोटी, अमृत वाढीव पाणीपुरवठा योजना अनुदान 248 कोटी, प्राथमिक सोयीसुविधा व नगरोत्थान अनुदान 200 कोटी, जीएसटी अनुदान 507 कोटी तसेच करेतर महसूल शास्ती व शुल्कचे 154.86 कोटींच्या जमेच्या बाजूंचा समावेश आहे. मात्र असे असले तरी पालिका क्षेत्रात सुरु असलेले मालमत्ताकराचा तिढा लक्षात घेता मनपा मालमत्ता कराचे 1800 कोटीचा कर वेळेत वसूल न झाल्यास अर्थसंकल्पाचा आकडा खाली सरकण्याची शक्यता आहे.

पालिकेच्या शेकडो कोटींच्या ठेवी जमेच्या बाजु असल्याने विशेषतः मुख्य लेखा व वित्तअधिकारी मंगेश गावडे आणि त्यांच्या टीमचे कौतुक आहे. हा अर्थसंकल्प सादर करताना आयुक्त मंगेश चितळे यांनी पनवेल महानगरपालिकेचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीचा अर्थसंकल्प आरोग्यावर भर देणारा होता. त्यादृष्टीने या अर्थसंकल्पात वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, 450 बेडचे हिरकणी हॉस्पिटल, कळंबोली मधील होल्डिंग पॉण्डचा विकास, गाढी नदीवर पनवेल शहरालगत पूर प्रतिबंधात्मक बंधारा बांधणे, 35 दैनिक बाजारांचे विकास, तारांगण बांधणे आदी महत्वाच्या कामांचे अंतर्भाव करण्यात आले आहे.

कोणत्याही प्रकारची कर वाढ नसलेला उत्पन्न वाढीवर भर देणारा गतिमान प्रशासनासाठी उपाययोजना करणारा, सर्वांगीण विकासासाठी नव्या शैक्षणिक संकल्पनांचा प्रभावी वापर करणारा असा हा अर्थसंकल्प आहे.भविष्याचा दुरगामी विचार करुन नव्या जलस्रोतांचा शोध घेणारा, शहर स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागावर भर देणारा पर्यावरण संरक्षण व संवर्धन करणारा हा अर्थसंकल्प पनवेलकरासाठी सादर करण्यात आला आहे.- मंगेश चितळे (आयुक्त,पनवेल महानगरपालिका)

टॅग्स :panvelपनवेलBudgetअर्थसंकल्प 2024