शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये निवडणुकीच्या प्रशिक्षणाला ७३० कर्मचाऱ्यांची दांडी, योग्य कारण द्या, अन्यथा होणार निलंबन

By वैभव गायकर | Updated: December 31, 2025 20:02 IST

Panvel Municipal Corporation Election: पनवेल महापालिका निवडणुकीचे कामकाज हाताळण्याच्या प्रशिक्षणाला तब्बल 730 कर्मचाऱ्यांनी  दांडी मारली. या प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक असताना शेकडो कर्मचारी विनापरवाना गैरहजर राहिले. यामुळे पालिका प्रशासनाने निवडणुकीसारख्या राष्ट्रीय कामकाजात अडथळा निर्माण केला आहे.

- वैभव गायकरपनवेल - महापालिका निवडणुकीचे कामकाज हाताळण्याच्या प्रशिक्षणाला तब्बल 730 कर्मचाऱ्यांनी  दांडी मारली. या प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक असताना शेकडो कर्मचारी विनापरवाना गैरहजर राहिले. यामुळे पालिका प्रशासनाने निवडणुकीसारख्या राष्ट्रीय कामकाजात अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.दि.29 ते 31 डिसेंबर दरम्यान फडके नाट्यगृहात हा प्रशिक्षण पार पडले.

स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर सोपविली आहे. या निवडणूक कामकाजासाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यात येत आहेत.पनवेल मध्ये जवळपास 4500 हजार कर्मचारी निवडणूकीच्या यंत्रणेत कामकाज पाहणार आहेत.

त्यानुसार महापालिका सार्वत्रिक निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण घेण्यात येत आहे. त्या प्रशिक्षणास संबंधित कर्मचारी, शिक्षक आणि नियुक्ती केलेल्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे, परंतु प्रशिक्षणास विनापरवाना गैरहजर राहून राष्ट्रीय कामकाजात अडथळा निर्माण करुन भारतीय लोकप्रतिनिधी अधिनियमन १९५१ चे कलम १३४ मधील तरतुदीचा भंग केल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येत असल्याने पालिकेने या कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.राष्ट्रीय कर्तव्यांची विद्यार्थ्यांना जाणीव करून देणाऱ्या शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. नोटीस प्राप्त होताच २४ तासांत खुलासा करण्याच्या सुचना उपायुक्तांनी या कर्मचाऱ्यांना केल्या आहेत.

तीन दिवसांचे प्रशिक्षणतीन दिवसाच्या प्रशिक्षणाला पहिल्या दिवशी 274 दुसऱ्या दिवशी 243 आणि तिसऱ्या दिवशी 213 कर्मचारी असे एकूण 730 कर्मचाऱ्यांनी दांडी मारली.

प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.योग्य उत्तर न दिल्यास या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात येईल.- कैलास गावडे (उपायुक्त,पनवेल महानगरपालिका )

English
हिंदी सारांश
Web Title : Panvel: 730 Employees Absent from Election Training, Face Suspension

Web Summary : 730 Panvel employees skipped mandatory election training. The administration issued notices, threatening suspension for inadequate explanations. Absences disrupted national election work, violating regulations. Teachers are among those facing action.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Panvel Municipal Corporation Electionपनवेल महापालिका निवडणूक २०२६