शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल-मुंब्रा महामार्ग खड्ड्यांत; वाहतूककोंडीसह अपघातांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 03:58 IST

रस्ता कुठे दिसत नाही, जिकडे-तिकडे खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

- अरुणकुमार मेहेत्रे कळंबोली : पनवेल-मुंब्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. विशेष करून कळंबोली गाव ते फायरब्रिगेड या दरम्यान रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. उड्डाणपुलाचे काम करीत असलेल्या टी अ‍ॅण्ड टी कंपनीच्या नाकर्तेपणाचे हे प्रतीक असल्याचा आरोप एकता सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत यांनी केला आहे. याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतर ठिकाणीही महामार्गाची परिस्थिती चांगली नाही.पनवेल-मुंब्रा महामार्गाची स्थिती पनवेल-सायन महामार्गासारखी आहे. कळंबोलीमध्ये उड्डाणपूल उभारीत असलेली टी अ‍ॅण्ड टी कंपनी पूल उभारीत आहे. पूल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी कळंबोली गाव ते फायरब्रिगेड या दरम्यान दोनही मार्गिकेची चाळण झाली आहे. रस्ता कुठे दिसत नाही, जिकडे-तिकडे खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. संबंधित कंपनी आणि रस्ते विकास महामंडळ बघ्याची भूमिका घेत आहेत. आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही रस्ता चांगला केला जात नाही, तीच परिस्थिती सर्व ठिकाणी या महामार्गावर आहे. ही परिस्थिती दरवर्षी उद्भवते, त्यामुळे पावसाळ्यात परिस्थिती अतिशय बिकट असते. रस्ते विकास महामंडळाला ज्या ठिकाणी खड्डे पडतात, तिथे कायमस्वरूपी उपाययोजना करणे क्र मप्राप्त आहे; परंतु तसे होत नसल्याने खड्ड्यांचे रडगाणे दरपावसाळ्यात गायले जाते. याप्रश्नी संबंधित यंत्रणांनी ठोस धोरण अवलंबून कार्यवाही करण्याची गरज असल्याचे मत माजी पंचायत समिती सदस्य नीलेश पाटील यांनी व्यक्त केले आहे. टी अ‍ॅण्ड टी कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकांनी या विषयी माहिती देताना सांगितले की, कळंबोली गावालगत भुयारी मार्ग असावा, या मागणीकरिता स्थानिक ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते. मध्यंतरी काही दिवस काम करता आले नाही.पाऊस सुरू झाल्याने आणखी अडचण आली. चार दिवसांत खड्डे बुजविण्यात येतील.टी अ‍ॅण्ट टी कंपनीने गेल्या दोन पावसाळ्यांत कळंबोलीकरांची गैरसोय केली आहे. त्याचे बक्षीस म्हणून टी अ‍ॅण्ड टी कंपनीला एमएसआरडीसी आणि सिडकोने पुढील काम दिले आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त करावे तितके कमीच आहे. कळंबोली फायरब्रिगेड ते काळभैरव मंदिर या दरम्यानचा रस्ता पाहिल्यानंतर ही नवी मुंबई आहे का की ग्रामीण रस्ता? असा प्रश्न पडतो. संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री कार्यालयाकडे करणार आहोत.- चंद्रकांत राऊत,अध्यक्ष,एकता सामाजिक सेवा संस्था

टॅग्स :Potholeखड्डेRaigadरायगडpanvelपनवेल