शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

पनवेलमध्ये शेकापकडे ४ तर भाजपाकडे ५ सरपंचपदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 06:40 IST

पनवेल तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींपैकी शेकापकडे ४ तर भाजपाकडे ५, शिवसेना १ अपक्ष १ सरपंचपद आले आहे.

पनवेल : तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींपैकी शेकापकडे ४ तर भाजपाकडे ५, शिवसेना १ अपक्ष १ सरपंचपद आले आहे. त्यामुळे गावांमध्ये शेकाप व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पनवेल तालुक्यातील चिंध्रण, वाघिवली, शिरढोण, शिवकर, कानपोली, करंजाडे, भाताण, नितळस, केळवणे, नेरे, दिघाटी या ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी थेट निवडणूक घेण्यात आली होती. एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले शेकाप व भाजपा यांनी या निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. सरपंच पदाची थेट निवडणूक असल्याने या पदासाठी जोरदार प्रचार करण्यात आला होता.शेकाप व भाजपाच्या वतीने गावांमध्ये प्रचार सभा आयोजित केल्या गेल्या होत्या व उमेदवारांना मतदान करण्यासाठी सांगितले जात होते. १६ मार्च रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीत जवळपास ९० टक्के मतदान झाले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या वतीने ग्रामपंचायतींवर आपलीच सत्ता येईल असे बोलले जात होते. त्यामुळे १७ जुलैच्या मतमोजणीकडे साºयांचे लक्ष लागून राहिले होते. पनवेल तहसील कार्यालय साईनगर येथे मतमोजणी करण्यात आली. जसजसे उमेदवार विजयी होत होते तसतसे पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा फडकवून विजयोत्सव साजरा करत होते. ५ ग्रामपंचायतींवर भाजपाचे, ४ ग्रामपंचायतींवर शेकापचे, १ ग्रामपंचायतीवर शिवसेना एका ग्रामपंचायतीवर अपक्ष सरपंच निवडून आले.शिवकर येथे सरपंचपद तर नेरेपाडा येथे सदस्य पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांमध्ये बरोबरी झाली होती. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने पुन्हा मतदान घेण्यात यावे यासाठी गदारोळ केला. मात्र पोलिसांनी यावेंळी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना शांत केले. शिवकर येथील सरपंचपदाचे भाजपाचे उमेदवार अनंत ढवळे व शेकापचे अनिल ढवळे या दोघांनाही ८४९ मते मिळाली. तर नेरे ग्रामपंचायतीत नेरेपाडा गावातील शेकापचे सुमन कातकरी व भाजपाच्या द्रौपदी कातकरी या दोन्ही उमेदवारांना २९७ मते पडली.त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चिठ्ठी काढून उमेदवाराला विजयी करण्याचे ठरवले. त्यानुसार सुमन व द्रौपदी कातकरी यांच्यासाठी अमर अंसुरी या तरु णाने चिठ्ठी काढली. यावेळी शेकापच्या सुमन कातकरी यांच्या नावाची चिठ्ठी निघाली, तर शिवकर येथील सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी देखील चिठ्ठी काढण्यात आली. यात नसीम खान या तरु णाने चिठ्ठी काढली. यात शेकापच्या अनिल ढवळे यांच्या नावाची चिठ्ठी काढण्यात आली व ते विजयी घोषित करण्यात आले.मुरु डमध्ये चार ग्रामपंचायतींवर सेनानांदगाव/ मुरुड/आगरदांडा : मुरु ड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे थेट सरपंचपदाचे उमेदवार विजयी ठरले आहेत. तर शेकापचे थेट सरपंच पदाचे उमेदवार हरिश्चंद्र भेकरे हे वावडुंगी ग्रामपंचायतीमधून मोठ्या फरकाने निवडून आले. वावडुंगी ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे दोन उमेदवार उभे होते. येथे मैत्रीपूर्ण लढत झाली, यामध्ये हरिश्चंद्र भेकरे विजयी झाले आहेत.काकळघर ग्रामपंचायतीवर शेकाप व शिवसेनेत सरळ लढत होऊन शिवसेनेच्या महिला उमेदवार १० मतांच्या फरकाने विजयी झाल्या आहेत. शिवसेनेच्या उमेदवार साक्षी ठाकूर यांना ६५७ मते तर शेकाप उमेदवार चैताली ठाकूर ६४७ मते मिळाली. वेळास्ते ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे थेट सरपंच पदाचे उमेदवार शरद खेडेकर हे विजयी ठरले आहेत. वेळास्ते ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे चार सदस्य तर शेतकरी कामगार पक्षाचे तीन सदस्य निवडून आले आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण महिला गटामधून शिवसेनेच्या वृषाली गायकर व शेतकरी कामगार पक्षाच्या समृद्धी खताते या दोघींनाही १३० अशी सारखी मते मिळाली. त्यामुळे लहान मुलाच्या हातून चिठ्ठी काढण्यात येऊन शेकापच्या समृद्धी खताते यांची चिठ्ठी निघाल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.च्कोर्लई ग्रामपंचायतीवर सर्व तालुक्याचे लक्ष वेधले होते. कारण येथून शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ हे स्वत: थेट सरपंच पदाची निवडणूक लढवत होते, ते मोठ्या फरकाने विजयी होत कोर्लई ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे कायमस्वरूपी अस्तित्व टिकून ठेण्यात मोलाचे कार्य केले आहे. थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत प्रशांत मिसाळ, प्रशांत मिसाळ यांचा १६६ मतांनी विजय झाला आहे. या ग्रामपंचायतीमधून शिवसेनेच्या लीना वेगास, मरिना मार्टीस, दीपाली म्हात्रे, प्राची म्हात्रे, दशरथ पैंतरी, रूमा वाघमारे या सदस्य विजयी झाल्या आहेत.विजयी सरपंचच्राजश्री पाटील,भाजपा, नेरेच्अनिल ढवळे,शेकाप, शिवकरच्अनिल पाटील,वाघिवली, शेकापच्साधना कातकरी,भाजपा, शिरढोणच्अमित पाटील,भाजपा, दिघाटीच्अश्विनी घरत,शिवसेना, केळवणेच्रामेश्वर आंग्रे,शेकाप, करंजाडेच्कमला देशकर,भाजपा, चिंध्रणच्सुभाष भोईर,शेकाप, भाताणच्विजया पाटील,भाजपा, कानपोलीच्सपना नंदू भोपी,अपक्ष, नितलस 

टॅग्स :Electionनिवडणूक