शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जमाफीच्या कार्यवाहीला सुरु वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:43 IST

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकºयांना कर्जमाफी योजना सुरू केली आहे. या योजनेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने सहकार विभागाच्या वतीने कर्जमाफीस पात्र असणाºया शेतकºयांकडून

विशेष प्रतिनिधी ।अलिबाग : महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकºयांना कर्जमाफी योजना सुरू केली आहे. या योजनेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने सहकार विभागाच्या वतीने कर्जमाफीस पात्र असणाºया शेतकºयांकडून आॅनलाइन व आॅफलाइन असा दोन्ही पद्धतीने अर्ज भरून घेण्यास सुरु वात झाली आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेला संलग्न असणाºया सर्व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या शेतकºयांचे फॉर्म बँकेच्या मदतीने भरून देण्याच्या सूचना बँकेने संस्थांच्या सचिवांना केल्या आहेत.हा फॉर्म रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाने अधिसूचित केलेल्या महा ई-सेवा केंद्रात देखील शेतकºयांना कर्जमाफीचे मोफत अर्ज भरण्याची सोय केली आहे. शेतकºयांना हा फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड समवेत मोबाइल क्र मांक लिंक केलेले आधारकार्ड आवश्यक आहे. आधार कार्ड असेल, परंतु त्यास मोबाइल क्र मांक लिंक केलेला नसेल तर अशा शेतकºयांचे बायोमेट्रिक्स पद्धतीने हे अर्ज भरून घेतले जाणार आहेत.जिल्ह्यामध्ये आॅनलाइन कर्जमाफीचे फॉर्म भरताना काही तांत्रिक अडचणी येत असल्यातरी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे क्षेत्रीय कर्मचारी यामध्ये शेतकºयांना साह्य करीत आहेत. यासंबंधित रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संलग्न असणाºया वि.का.सेवा सहकारी संस्थांच्या शेतकºयांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखा किंवा संस्थांचे सचिव यांच्याशी संपर्क साधायचा आहे, त्यानंतर शेतकºयांनी आपली माहिती त्वरित जवळच्या महा ई-सेवा केंद्रावरती सादर करावयाची आहे.रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून या शेतकºयांचे आॅफलाइन पद्धतीने देखील फॉर्म भरून घेतले जात आहेत. यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकºयांनी शासनाच्या योजनेतील निकषांच्या आधारावर कर्जमाफी वा प्रोत्साहनपर इतर लाभ मिळवण्यासाठी त्वरित फॉर्म भरावे, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.