पेण : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीमध्ये पुराचे पाणी गेले आहे. सतत पाच दिवस शेतात पाणी तुंबल्याने पेण, वाशी, वडखळ परिसरातील सुमारे ४००० हेक्टर क्षेत्रावरील भातरोपे कुजून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.कृषी विभागाच्या सहायक कृषी अधिकारी निंबाळकर यांनी परिसरातील पूरपरिस्थितीचा पाहणी दौरा केला असून, पीक नुकसानाचा अहवाल तयार करण्यात आल्याचे सांगितले. संततधार पावसामुळे पेण-खारेपाट विभाग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे शिवारातील नर्सरी रोपे कुजून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. सुरुवातीचा पाऊस समाधानकारक पडल्याने बी-बियाण रुजून चांगली उगवण झाली होती. भात गादीवाफे हिरव्या गालिच्यासारखे दिसू लागले होते. रोप चांगली निभावल्याने गतवर्षीच्या प्रमाणे यंदाही खरीप हंगामात चांगली सुरुवात होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, त्यानंतर पावसाने चक्क २० दिवस दांडी मारून शेतकºयांना प्रतीक्षा करायला लावली. त्यानंतर जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने सगळीकडे दाणादाण उडवली.शिवारात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन नर्सरी रोपांच्या डोक्यावरून पाणी गेले आहे. शेतात तुंबलेले पाणी पाच दिवस तसेच राहिल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. चार हजार हेक्टर क्षेत्रावरील लागवडीयोग्य रोपे कुजून नष्ट झाली. आता या नुकसानाची तातडीने भरपाई करणे शेतकºयांना शक्य होणार नाही. बियाणांची जमवाजमव करण्यासाठी त्यांना आतापासूनच धावपळ करावी लागत आहे. पावसाच्या लहरीपणाचा शेतकºयांना सामना करावा लागत असून त्याच्या उत्पन्नावरही परिणात होत आह>माणगावमध्ये चारसूत्री भात प्रात्यक्षिककृषी विभाग माणगाव अंतर्गत मौजे माकटी येथे चारसूत्री भात प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. या चारसूत्री लागवडीमुळे शेतकºयांचे उत्पन्न वाढणार असल्याने भविष्यात आधुनिक पद्धतीने लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग माणगाव अंतर्गत तालुका कृषी अधिकारी पी. बी. नवलेंच्या मार्गदर्शनाखाली मौजे माकटी येथे भातपीक शेतीशाळा राबविण्यात येत आहे. या शेतीशाळे अंतर्गत मौजे माकटी येथील शेतकºयांना आधुनिक पद्धतीचा वापर करून भातपीक लागवड करणे याबद्दल प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. मौजे माकटी येथील कृषिसेवक गोविंद पाशीमे यांनी नियंत्रित चारसूत्री भात लागवड, हिरवळीच्या खतांचा वापर करण्यासाठी गिरीपुष्प पाल्याचा वापर इत्यादीबद्दल प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे मजुरांची बचत होते. रोपे कमी प्रमाणात लागतात, नियंत्रित लागवड केल्यामुळे भातशेतीमध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी होतो, तसेच उत्पादन खर्च कमी येऊन उत्पन्नात वाढ होते. इत्यादीबद्दल माहिती देण्यात आली.
पेणमध्ये ४००० हेक्टरवरील भाताची रोपे कुजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:35 IST