शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतच्या नवसूची वाडीमधील ग्रामस्थांची पाणीटंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 22:55 IST

श्रमदानातून नदीवर बांधला बंधारा : प्रादेशिक बंदर विभाग, अलिबाग कार्यालयाचा पुढाकार

कांता हाबळे नेरळ : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका म्हणजे आदिवासी बहुल भाग असलेला तालुका आहे. तेथीलच एक आदिवासीवाडी म्हणजे नवसूची वाडी. या भागात उन्हाळा सुरू झाल्यावर पाणीटंचाईचे संकट आ वासून उभे ठाकते. या पाणीटंचाईवर उपाययोजना शासनस्तरावरआजवर होऊ शकलेली नाही, त्यामुळे येथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रादेशिक बंदर विभाग अलिबाग यांनी पुढाकार घेत नदीवर ग्रामस्थांच्या मदतीने श्रमदानातून बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे. यामुळे येथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकले असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नवसूची वाडी हे गाव साधारण डोंगराळ भागात असून, साधारण १०० ते २०० घरांची वस्ती येथे आहे. गावातील कुटुंबाला शेती सोडून रोजगाराचे इतर काही साधन नाही. पावसाळ्यात शेतीमध्ये भाजीपाला, तांदूळ असे काहीतरी पिकवायचे आणि त्यावर पुढचे आठ महिने काढायचे. इतर वेळी भाजीपाला पिकवायला शेतीला पाणीच नाही, त्यामुळे मोलमजुरी शिवाय पर्याय नाही. तीही कायम नसते. कष्ट व मेहनत करण्याची जिद्द असलेल्या येथील लोकांना सरकारची मात्र साथ नाही. त्यामुळे कसातरी उदरनिर्वाह करायचा. येथील महिला मोहाची फुले वेचून ती सुकवून १० ते २० रुपयांना विकून दोन पैसे जोडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, शासनाला आणि येथील पुढारी लोकप्रतिनिधींना याचे सोयर सुतक नाही.

नवसूची वाडी गावाजवळून खांडस येथून उगम पावणारी धार नदी वाहते. मात्र, नदीचे पाणी हे एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण आटते. तेव्हा पुढील दोन महिने मे व जूनमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू होते. प्रामुख्याने येथील महिलांना दोन ते तीन किलोमीटर इतरत्र जाऊन पाणी डोक्यावरून आणावे लागते, याचा तेथील महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो. या गावाच्या लोकांचा रोजगार हा मोलमजुरी असून स्थानिकांचे हे दोन महिने प्रामुख्याने महिलांचे पाणी भरण्यात जातात. घरातील एक सदस्य पूर्ण वेळ घरी राहिल्याने त्याचा परिणाम त्या घरातील रोजगारावरही होतो. ही जाण असलेल्या व गावातून शिकून सध्या प्रादेशिक बंदर विभाग, अलिबाग येथे बंदर निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या महेश लक्ष्मण होले हे गावातील या परिस्थितीने व्यथीत झाले होते. तेव्हा आपल्या वरिष्ठ, सहकारी व ग्रामस्थ यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनी श्रमदान करून नदीवर बंधारा बांधण्याचा निश्चय केला.

नवसूची वाडी येथे अडवलेले पाणी आता पाइपलाइनने गावापर्यंत नेऊन ते गावात पोहोचविण्याचा आपला पुढील मानस असल्याचे बंदर निरीक्षक महेश लक्ष्मण होले व वारे ग्रामपंचायत सदस्य भास्कर कमळू कांबडी यांनी सांगितले आहे. या श्रमदान उपक्रमात आंतरराष्ट्रीय तिरंदाज खेळाडू कॅप्टन अजित टोपणो, अलिबाग बंदर निरीक्षक कार्यालयाचे बंदर निरीक्षक महेश होले, समीर बारापात्रे, अमर पालवणकर, लिपिक आशिष सानकर, अजय चव्हाण, लेखापाल शैलेश खोत, ग्रामपंचायत सदस्य भास्कर कमळू कामडी आदीसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सहभागी झाले होते.लोकसहभागातून धारा नदीवर बंधाराबंधाºयामुळे नदीचे पाणी अडवून साठा केल्यास त्याचा फायदा पाळीव प्राणी व इतर वन्य प्राण्यांनासुद्धा होणार आहे. तसेच यातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पनासुद्धा लोकसहभागातून व श्रमदानातून पूर्ण होणार आहे. त्यामुळे प्रादेशिक बंदर विभाग कार्यालय, अलिबाग यांच्यासह नवसूची वाडी, हºयाची वाडी व कुरुंग येथील २०० ग्रामस्थांनी श्रमदान करत धार नदीवर बंधारा बांधून पूर्ण केला आहे.आमच्या गावात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होते, शासनाचे टँकर येतात; पण ते पुरत नाहीत. त्यामुळे गावातील महिलांना मैलोन्मैल पाण्यासाठी पायपीट करावी लागते. आमच्या गावातील अधिकारीपदावर काम करणारे महेश होले यांनी श्रमदानाची संकल्पना आम्हाला सांगितली. त्यानुसार गावातील नदीवर आम्ही श्रमदानातून बंधारा बांधला आहे. त्यामुळे नदीतील लवकर आटणारे पाणी आता जास्त दिवस आम्हाला वापरता येईल, अशी आशा आहे. या श्रमदानाच्या कल्पनेतून आम्ही पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. - भास्कर दोरे, ग्रामस्थ नवसूची वाडीनवसूची वाडी येथे उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. येथील महिलांना पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर बाहेर जावे लागते, हे चित्र बदलण्याचा संकल्प आम्ही केला आणि ग्रामस्थांशी बोलून त्यांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले. श्रमदानातून बंधारा बांधण्याची संकल्पना आज पूर्णत्वास आली आहे. माझे मित्र, सहकारी व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून शासनाची ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम आम्ही येथील नवसूची वाडी येथे राबवली आहे. त्याप्रमाणे माझे इतर मित्र आहेत तेही उच्च पदावर कार्यरत आहेत, त्या सर्वांना सांगितले, तेव्हा सर्वांना कल्पना आवडली; त्यांनीही यासाठी श्रमदान केले. - महेश होले, बंदर निरीक्षक, अलिबाग

टॅग्स :Waterपाणी