शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक तोफ द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविण्यासाठी शिवप्रेमी संघटना एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2022 21:56 IST

रविवारी (११) हर हर महादेव, जय शिवराय जय शिवाजीचा घोष करीत विविध संघटनांचे सुमारे १२५  शिवप्रेमींनी पहाटे चार वाजल्यापासूनच चेनकप्पी, रस्सी आणि हायजोशच्या जोरावर ऐतिहासिक तोफ गडावर नेण्यासाठी सुरुवात केली आहे.

- मधुकर ठाकूर

उरण :  मागील वर्षी उत्खननात सापडलेली दोन टनांपर्यंत वजनाची आणि साडेसात फूट लांबीची एक शिवकालीन ऐतिहासिक तोफ द्रोणागिरी डोंगरावरील द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविण्यासाठी शिवप्रेमी,दुर्ग प्रेमी संघटना एकवटल्या आहेत. रविवारी (११) हर हर महादेव, जय शिवराय जय शिवाजीचा घोष करीत विविध संघटनांचे सुमारे १२५  शिवप्रेमींनी पहाटे चार वाजल्यापासूनच चेनकप्पी, रस्सी आणि हायजोशच्या जोरावर ऐतिहासिक तोफ गडावर नेण्यासाठी सुरुवात केली आहे. मागील वर्षी बांधकामासाठी खोदकाम करताना द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी खोदकाम सुरू असताना अचानक एक ऐतिहासिक तोफ सापडली होती.शिवकालीन पुरातन असलेली तोफ सात फूट लांबीची आणि दोन टनांपर्यंत वजनाची आहे.ही ऐतिहासिक शिवकालीन तोफ मागील वर्षभर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या डाऊरनगर येथील शाळेच्या आवारात ठेवण्यात आली होती.पुरातन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे धुळखात पडून राहिलेली ही ऐतिहासिक तोफ जतन करण्याची गरज आहे.शिवकालीन इतिहास युवा पिढीलाही ज्ञात व्हावा यासाठी द्रोणागिरी किल्ल्यावरच तोफ स्थानापन्न करण्याची आवश्यकता असल्याची बाबही येथील शिवप्रेमी,दुर्ग प्रेमी संघटनांच्या लक्षात आली.

उरण तालुक्यातील सुमारे दहा शिवप्रेमी,दुर्ग प्रेमी संघटनांनी एकत्रित येऊन विचार विनिमय करून ऐतिहासिक वारसा असलेली शिवकालीन तोफ  काहीही, कसंही करून  द्रोणागिरी डोंगरावरील द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविण्यावर एकमत झाले आणि रविवारी (११) प्रत्यक्षात सुमारे १२५ शिवप्रेमींनी पहाटे कामालाही सुरुवात केली. दोन टन वजनाची आणि साडेसात फूट लांबीची तोफ ९०० ते १००० मीटर उंचीच्या द्रोणागिरी डोंगरावरील द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविणे साधे काम नसल्याचे माहिती असतानाही युवा शिवप्रेमींनी रविवारी जिद्दीने कामाला सुरुवात केली.

आधी पायथ्यापर्यंत जेसीबीने त्यानंतर चेनकप्पी,रस्सींच्या जोरावर दोन टन वजनाची ऐतिहासिक तोफ द्रोणगिरी किल्ल्यावर पोहचविण्यास सुरुवात केली आहे.शिवरायांचा घोष आणि हायजोशची हाळी देत तोफ दुपारी चार वाजेपर्यंत डोंगराच्या मध्यावर पोहचविण्यात शिवप्रेमींना यश आले आहे.विसाव्यानंतर पुन्हा एकदा शिवरायांचा घोष आणि हायजोशची हाळी देत तोफ द्रोणगिरी किल्ल्यावर पोहचविण्यास सुरुवात केली आहे. द्रोणगिरी किल्ल्यावर पोहचविण्यासाठी आणखी किती वेळ लागेल हे आत्ताच निश्चितपणे सांगता येणार नसल्याचे शिवप्रेमी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Raigadरायगड