शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा जमीन संपादनाला नव्याने विरोध, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दिले निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 00:46 IST

शहापूर-धेरंड परिसरातील जमिनींवर टाटा कंपनीचा औष्णिक वीज प्रकल्प उभारण्यात येणार होता;

अलिबाग : तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरातील जमिनींवर टाटा कंपनीचा औष्णिक वीज प्रकल्प उभारण्यात येणार होता; मात्र गेल्या ११ वर्षांत या ठिकणी कोणत्याच प्रकल्पाची साधी एक वीटही लावण्यात आलेली नाही. असे असताना सरकार आता नव्याने याच परिसरातील तब्बल एक हजार ८०० एकर जमिनी संपादित करण्याच्या हालचाली सरकार आणि प्रशासकीय पातळीवरून करण्यात येत आहे. आधी संपादित केलेल्या जमिनींवर प्रकल्प उभारावा आणि नंतरच नव्याने जमिनीचे संपादन करावे, अशी मागणी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केली.याच परिसरामध्ये इंडोनेशियन कंपनी आपला प्रकल्प उभारण्याच्या तयारीत असल्याने रायगडमधील भाजप आक्रमक झाल्याचे दिसून येते. २००६-०७ साली अलिबाग तालुक्यातील शहापूर आणि धेरंड परिसरामध्ये टाटाचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. यासाठी परिसरातील तब्बल एक हजार २०० एकर जमिनीचे संपादन करण्यात आले होते. त्या वेळी स्थानिक शेतकऱ्यांनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर या प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. जमिनीवरील लढाईसह कायदेशीर लढाई येथीस स्थानिक शेतकऱ्यांनी श्रमिक मुक्ती दलाच्या झेंड्याखाली लढली होती. पुढे टाटाला आपला प्रकल्प गुंडाळावा लागला होता. त्यानंतर त्या जमिनी तशाच पडून होत्या. आता याच परिसरामध्ये सरकार जिल्हा प्रशासनाच्या मदतीने एमआयडीसी अ‍ॅक्टनुसार जमिनीचे संपादन करण्याच्या तयारीत आहे. जमिनीचे संपादन करताना या ठिकाणी कोणता प्रकल्प येणार याबाबत स्थानिकांना कोणतीच कल्पना नाही. प्रकल्प कोणता येणार याची माहिती नसताना सरकार प्रशासनामार्फत जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया कशी काय राबवू शकते, असा सवाल आता स्थानिक पातळीवरून विचारला जात आहे. मात्र, त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिकांच्या बाजूने आता भाजपने उडी घेतली आहे.स्थानिकांचा आवाज बनण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी मंगळवारी राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. आधी संपादन केलेल्या जमिनीवर प्रकल्प उभारावा आणि नंतरच नव्याने जमिनीचे संपादन करावे, अशी मागणी केली. या बाबतीत सरकारला अधिवेशनात जाब विचारावा, अशीही मागणी त्यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी दरेकर यांना दिले. याप्रसंगी भाजप किसान मोर्चाचे राकेश पाटील, भाजपचे अल्पसंख्याकाचे नेते आमीर खानजादा, संघर्ष समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.।प्रकल्पाबाबत स्थानिकांना कल्पना नाहीआता याच परिसरामध्ये सरकार जिल्हा प्रशासनाच्या मदतीने एमआयडीसी अ‍ॅक्टनुसार जमिनीचे संपादन करण्याच्या तयारीत आहे. जमिनीचे संपादन करताना या ठिकाणी कोणता प्रकल्प येणार याबाबत स्थानिकांना कोणतीच कल्पना नाही.