शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटल्यावरच काळ प्रकल्पाचे काम होऊ देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 05:35 IST

माणिक जगताप : प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत दिला इशारा

महाड : काळ जलविद्युत प्रकल्पात सांदोशी, बावले, निजामपुरातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लागल्याखेरीज प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करू देणार नाही, असा इशारा महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांनी गुरुवारी दिला. तीन गावांतील प्रकल्पग्रस्तांची बैठक प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी आपल्या दालनात आयोजित केली होती. बैठकीला काळ प्रकल्प विभागाच्या भूसंपादन अधिकारी प्रतिभा इंगळे, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता के. मचार, तालुका भूमी अभिलेख, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्त नागरिकांना ८६ कोटींचा निवाडा देण्याबाबतचा निर्णय झाला होता. मात्र हा निवाडा नंतर २४ कोटी रुपयांवर आणला गेला. दहा वर्षांत निवाड्याची रक्कम वाढवण्याऐवजी कमी झाली आहे. याबाबतचे सविस्तर विवेचन जगताप यांनी केले. त्यावर बोलताना केवळ घरांची नुकसान भरपाई देताना २०१३ चा कायदा लागू झाल्याने ही रक्कम कमी झाल्याचा दावा भूसंपादन अधिकारी इंगळे यांनी केला. निवाड्यात अनेकांची नावे गहाळ झालेली आहेत. कोटींची मालमत्ता संपादित करण्यात आली असली तरी त्यांची नावे निवाडा यादीमध्ये नाहीत. याबाबी प्रकल्पग्रस्तांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर योग्य तो मार्ग काढण्याची आणि आवश्यक ते प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्याची ग्वाही इंगळे यांनी दिली.प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ज्या जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत, त्या ठिकाणी पुनर्वसन करून घेण्यास प्रकल्पग्रस्त तयार नसल्याचे, तर अनेकांना आपले पुनर्वसन कुठे होणार आहे याचीच माहिती नसल्याचे बैठकीत आढळून आले. त्यावर सर्व प्रकल्पग्रस्तांना, त्यांचे पुनर्वसन कुठे होणार आहे याची माहिती घेऊन त्यांचे संमतीपत्र घेण्याच्या सूचना प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिल्या. जागा, जमिनी, झाडांची मोजणी करताना त्रुटी राहिल्यास त्याच्या मोबदल्यात प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे इंगळे यांनी सांगितले.प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे काम स्थानिक आमदारांचे होते. नुकसान भरपाईमध्ये प्रकल्पग्रस्तांना नुकसान होत असल्याचे दिसून आल्यानंतर, त्यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. आता नुकसान भरपाईबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झालेला असल्यामुळे न्यायालयात जाण्याखेरीज पर्याय नाही. मात्र तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा करणार असून, शक्य झाल्यास त्यांच्या समवेत सर्व विभाग आणि प्रकल्पग्रस्तांची बैठक घेवू.- माणिक जगताप, माजी आमदार 

टॅग्स :Raigadरायगड