शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळा बँक प्रकरणी न्यायालयात ऑनलाईन प्रतिज्ञापत्र दाखल; पनवेल संघर्ष समितीचा प्रांत कार्यालयावर मोर्चा 

By वैभव गायकर | Updated: March 12, 2024 16:46 IST

समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर धडक दिली.

लोकमत न्युज नेटवर्क वैभव गायकर,पनवेल: राज्य सरकार आणि प्रांतधिकाऱ्यांविरोधात पनवेल संघर्ष समिती प्रेरित कर्नाळा बँक ठेवीदारांनी केलेली निदर्शने अंशत: यशस्वी झाले. संघर्ष समितीने इशारा देताच प्रांतधिकाऱ्यांनी दि.11 रोजी  सोमवारी न्यायालयात ऑनलाईन प्रतिज्ञापत्र दाखल करून घेतले.दि.12 रोजी कर्नाळा बँक ठेवीदारांकरिता पनवेल संघर्ष समितीने राज्य सरकार आणि पनवेलचे प्रांताधिकारी  राहुल मुंडके यांच्याविरोधात शेकडो ठेवीदार आणि संघर्ष समितीने निदर्शन केली.

 समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर धडक दिली. तेव्हा मुंडके उपस्थित राहिले नाहीत. मात्र, नायब तहसीलदार श्रीकांत शेलार आणि नायब तहसीलदार डॉ. सुनील जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल चौघुले यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत कांतीलाल कडू यांच्याकडे ऑनलाईन प्रतिज्ञापत्र सादर केल्याची प्रत यावेळी शिष्टमंडळाला दिली.

तातडीने ऑफलाईन प्रतिज्ञापत्र एमपीआयडी न्यायालयात सादर करताना सरकारी वकीलांचे साहाय्य करावे, तसेच आठ दिवसात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे बैठकीचे आयोजन करावे. तसे न केल्यास ठेवीदार सामूहिक आत्मदहन करतील आणि त्याची जबाबदारी म्हणून प्रांताधिकारी यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल असा ईशारा कांतीलाल कडू यांनी बैठकी दिला. ठेवीदारांच्या विरोधात स्थानिक आमदार, शेकाप नेते, राज्य सरकार आणि सरकारी अधिकारी काम करीत असल्याने ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळण्यास उशीर होत आहे.याचे परिणाम संबंधितांना भोगावे लागतील अशी प्रतिक्रिया कांतीलाल  कडू यांनी यावेळी दिली.