शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ओएनजीसी प्रकल्पातील तेल गळतीमुळे किनारा काळवंडला; उरणमधील पिरवाडी समुद्रकिनारी तेलाचे जाड थर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 06:33 IST

मोठ्या प्रमाणावर लागलेल्या गळतीमुळे क्रूड ऑइलचे थर संरक्षक भिंतीजवळ असलेल्या मागणीदेवीच्या नाल्यातून थेट पीरवाडी परिसरातील किनाऱ्यावर पोहोचले. 

उरण : ओएनजीसीच्या उरण प्रकल्पातील क्रूड ऑइल साठवणीच्या नादुरुस्त व्हॉल्व्हमुळे शुक्रवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर गळती लागली. यामुळे लाखो लिटर्स क्रूड ऑइल नाल्यातून थेट समुद्रात पोहोचल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण झाले आहे. पिरवाडी समुद्र किनाऱ्यावरील परिसरात तेलाचे जाड थर निर्माण झाल्याने समुद्र काळवंडला आहे. परिसरातील मासेमारीही धोक्यात आली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ओएनजीसी प्रशासनाने किनाऱ्यावरील जमा झालेले ऑइलचे थर मशीन, कामगारांच्या साहाय्याने ड्रममध्ये भरून गोळा करण्याचे काम पहाटेपासूनच युद्धपातळीवर सुरू केले आहे. 

मोठ्या प्रमाणावर लागलेल्या गळतीमुळे क्रूड ऑइलचे थर संरक्षक भिंतीजवळ असलेल्या मागणीदेवीच्या नाल्यातून थेट पीरवाडी परिसरातील किनाऱ्यावर पोहोचले. ओएनजीसी व्यवस्थापनाला गळतीची माहिती मिळाल्यानंतर, पहाटेपासूनच किनाऱ्यावर जमा झालेले ऑइलचे जाड थर कामगार लावून ड्रम, बादली, सक्शन पंपने गोळा केले जात आहेत. मात्र, नाल्यातून वाहत गेलेले क्रूड ऑइल थेट समुद्रात पोहोचल्याने पाण्यावर तवंग दिसू लागले आहेत.

तेल गळतीचे प्रकार सुरूच

ओएनजीसीत वारंवार घडणाऱ्या तेल गळतीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार होऊ लागले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  या आधी तेल गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत अधिकारी, अग्निशमन दलाच्या जवानांसह पाच जण मृत्यू पावले आहेत. उरण ओएनजीसी प्रकल्पात जुने जाणकार आणि अनुभवी कामगार सेवानिवृत्त झाले आहेत.  नव्याने भरती झालेले अधिकारी आणि कामगार यांना प्रकल्पाची फारशी माहिती नसल्यामुळेच प्रकल्पात वारंवार तेल गळतीचे प्रकार घडत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक कामगारांकडून केला जात आहे. 

प्रकल्पातील साठवण टाकीच्या व्हॉल्व्ह लीकेजमुळे क्रूड ऑइल नाल्यातून थेट समुद्र किनाऱ्यावर पोहोचले आहे. गळतीमुळे किनाऱ्यावर जमा झालेले तेल जमा करण्याचे पहाटेपासूनच युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. समुद्रात जाण्याआधीच तेल जमा करण्यात येत असल्याने, परिसरातील मासेमारी, शेती  आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. - सुभोजीत बोस, मुख्य प्रकल्प अधिकारी.

टॅग्स :Raigadरायगड