शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

उंबर्डीत संशयावरून एकाचा खून

By admin | Updated: November 4, 2015 00:48 IST

तालुक्यातील उंबर्डी आदिवासीवाडी येथे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन गळा चिरु न खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. माणगांव पोलिसांनी तपास करुन

माणगांव : तालुक्यातील उंबर्डी आदिवासीवाडी येथे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन गळा चिरु न खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. माणगांव पोलिसांनी तपास करुन आरोपीला १८ तासांत जेरबंद केले आहे.उंबर्डे आदिवासीवाडी येथील गणपत जाधव हे पत्नी व आईसह जंगलात एकच घर असलेल्या ठिकाणी राहतात. ३१ आॅक्टोबरला गणपत जाधव जेवण करुन झोपी गेल्यानंतर रात्री आई व पत्नीला जाग आली, तेव्हा गणपत अंथरुणात नसल्याचे पाहून त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता ते सापडले नाही. नेहमीप्रमाणे खेकडे पकडायला गेले असतील असे समजून सर्वजण झोपी गेले. सकाळीसुद्धा गणपत जाधव परत न आल्याचे पाहून पत्नी पिठी जाधव हिने शोध घेतला असता घरापासून काही अंतरावर ओढ्यामध्ये गणपत जाधवचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. याबाबत पत्नीने पोलीस पाटलांना सांगितले. पोलीस पाटलांनी माणगांव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यावेळी तातडीने माणगांवचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे व पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी तपास सुरु केला, असता खरा प्रकार उघडकीस आला.गणपत जाधव याचा साडू व पत्नी यांचे अनैतिक संबंध असावेत असा संशय गणपतला येत असल्याने त्यांचे नेहमी वाद होत असत. ३१ आॅक्टोबरला असाच वाद झाल्यानंतर आरोपीने बोलत बोलत त्याला घराजवळच्या ओढ्यापर्यंत नेले. त्याठिकाणी आणखी वाद झाल्यावर आरोपीने मागून कोयत्याने गणपतच्या गळ्यावर जोरदार वार केले. (वार्ताहर)