नांदगाव/ मुरु ड : खासगी रु ग्णालयात इलाज चांगला होतो, असा लोकांचा बराच गैरसमज आहे, त्यामुळे पैशांची तमा न बाळगता लोक खासगी रुग्णालयात जास्त भरती होतात. परंतु याच खासगी डॉक्टरांना आम्ही शिकवत असतो. ते आमच्याच हातून प्रशिक्षित होत असतात. ज्या वेळी एखादा रु ग्ण त्यांच्या हातून गंभीर होतो त्यावेळी हे सर्व डॉक्टर अंतिम उपाय म्हणून जे.जे.हॉस्पिटलची वाट धरतात. जे.जे. रु ग्णालयात रु ग्णांचा इलाज स्वस्त व योग्य तज्ज्ञ वैद्यकीय तपासणी करून होत असतो. त्यामुळेच जे.जे.मध्ये १० लाख लोक वर्षाला इलाज करण्यासाठी भरती होत आहे. ४२ हजार शस्त्रक्रि या होत असून लोकांचा वाढता विश्वास आम्हाला जगण्याची प्रेरणा देत असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पुरस्कार विजेते व जे.जे. रु ग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी मुरु ड येथे केले.मुरु ड शहरातील शिवसेना शहर शाखेमार्फत नेत्रचिकित्सा व शस्त्रक्रि या शिबिराचे सलग ९ व्या वर्षी आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.लहाने बोलत होते. डॉ. लहाने म्हणाले की, दृष्टी चांगली शाबूत राहण्यासाठी सकाळ संध्याकाळ दोन वेळा रोज डोळे थंड पाण्याने धुवावे. गाजर, पपई, शेंगा तसेच मासे फ्राय न करता खाल्ल्यास आपणास अ जीवनसत्व प्राप्त होऊन नजर चांगली राहते. प्रास्ताविक शहर शिवसेना अध्यक्ष प्रमोद भायदे यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, डॉ. रागिणी पारेख, नगरसेवक अशोक धुमाळ आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
वर्षाला १० लाख लोक जे.जे. मध्ये उपचारासाठी भरती होतात
By admin | Updated: February 20, 2017 06:12 IST