शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

महाडजवळ दोन टेम्पोंच्या धडकेत एक ठार, सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 23:49 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी महाड तालुक्यातील टोळ फाट्याजवळ दोन टेम्पो समोरासमोर धडकले. या अपघातात एक जण ठार, तर सहा प्रवासी जखमी झाले.

दासगांव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी महाड तालुक्यातील टोळ फाट्याजवळ दोन टेम्पो समोरासमोर धडकले. या अपघातात एक जण ठार, तर सहा प्रवासी जखमी झाले.मुंबई ते महाबळेश्वरला एक टेम्पो (एमए २0 सीटी ७८७८) जात होता. मंगळवारी सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास महाड तालुका हद्दीतील टोळ फाट्याजवळ आला असता, रत्नागिरी ते मुंबई आंबा वाहतूक करणारा टेम्पो (एम.एच.0८डब्ल्यू ८४४९) यावर विरुद्ध दिशेने जाऊन आपटला. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अपघातात मुंबई ते महाबळेश्वर जाणाऱ्या टेम्पोचालक महमद असलम खान (२४, रा. भांडुप) जागीच ठार झाला तर याच टेम्पोमधील तन्मय रावळे (१७), राकेश भांबरे (१८), अक्षय रहाटे (२0), नितीन दुबे (१८), शुभम गोसावी (१८) आणि योगेश खैर (२६, सर्व राहणार, मुंबई गोरेगाव) हे सहा प्रवासी जखमी झाले. जखमींवर दासगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र व महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.अपघातानंतर एक टेम्पो रस्त्याच्या मध्यभागीच अडकून पडला. त्यामुळे दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या. या कोंडीत एक रुग्णवाहिकाही अडकून पडली होती. अपघातनंतर बराच वेळ वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याने वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत होता.दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमीमाणगाव : दुचाकी घसरून साईन बोर्डावर धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला तर त्याचा सहकारी जखमी झाला. हा अपघात मंगळवारी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास तळेगाव येथे झाला. विनित गंगाधर मुनलोड ( १९, सध्या रा. लोणेर) हा दुचाकीवरून मित्राला माणगांव रेल्वेस्थानकातून लोणेरेकडे घेवून येत होता. त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती साईन बोर्डावर धडकली. यामध्ये विनितचा मृत्यू झाला तर रनविजय धर्मसिंग चव्हाण (सध्या रा. लोणेरे) हा जखमी झाला. त्याच्यावर माणगांव उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद गोरेगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

टॅग्स :Accidentअपघात