शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीर वाजेकर कॉलेजमध्ये एकदिवसीय स्वयंरोजगार कौशल्यविकास व अर्थसहाय्य कार्यशाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 16:31 IST

उरण  येथील  वीर वाजेकर आर्ट्स सायन्स व कॉमर्स कॉलेजमध्ये  प्लेसमेंट सेल व जिल्हा उद्योग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय स्वयंरोजगार कौशल्यविकास व  अर्थसहाय्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

मधुकर ठाकूर 

उरण  येथील  वीर वाजेकर आर्ट्स सायन्स व कॉमर्स कॉलेजमध्ये  प्लेसमेंट सेल व जिल्हा उद्योग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय स्वयंरोजगार कौशल्यविकास व  अर्थसहाय्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. डॉ आमोद ठक्कर यांनी  उरणच्या परिसरातील कौशल्य आधारित शिक्षणाची गरज  व त्याची आवश्यकता तसेच उद्योजकांना असलेल्या प्रचंड संधी आणि  कार्यशाळेच्या उद्देशही माहिती  करून दिली. 

कार्यक्रमात पाहुणे म्हणुन जिल्हा उद्योग केंद्र इन्स्पेक्टर मोहन पालकर यांनी त्यांच्या मार्फत उद्योजकता प्रशिक्षण  सुविधांची माहिती दिली.  तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगाला  लागणारे  भांडवल मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रममधून दिले जाणारे उत्पादन व सेवा सुविधांसाठी मिळणारे कर्ज व त्याचे अनुदान त्यात महिला व श्रेणीतील व्यक्तींना विशेष अनुदानाची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना कौशल्य विकासासाठी विविध प्रकारचे कोर्स राबविण्यात येतात. त्यांचीही माहिती दिली. हे कोर्स  पूर्ण केल्यावर शासकीय सर्टिफिकेट व स्टायपेंडही  दिली जाते. तसेच कौशल्य आधारित स्वयंरोजगारासाठी केंद्र व  राज्य शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावे यासाठी बँक आपणास पंतप्रधान योजना व मुख्यमंत्री योजना या मार्फत  सबसिडीचे कर्ज अत्यल्प व्याजदराने उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्र इन्स्पेक्टर मोहन पालकर यांनी दिली.

अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य पी. जी. पवार यांनी महाविद्यालयात कौशल्य विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची  तसेच आपल्या परिसरातील उद्योजकांना असलेल्या प्रचंड संधीची माहिती करून दिली. यशस्वी उद्योजक होण्यासाठी लागणार्‍या सर्व सुविधा महाविद्यालयातर्फे उपलब्ध केल्या जातील. प्रत्यक्षात स्वयंरोजगाराच्या छोट्या मोठ्या संधी हेरून धाडस करावे लागेल. आहे त्या साधन सामुग्रीचा वापर करुन शासनाच्या विविध योजना ज्यामध्ये प्रशिक्षण व निधि उपलब्ध करून दिला जातो. त्याचा फायदा घ्यावा. तसेच आपल्या परिसरात मत्स्य व्यवसायमध्ये मत्स्य शेती, मत्स्य प्रक्रियामध्ये विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न करावेत व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे पवार यांनी आवाहन केले.  या आयोजित  कार्यशाळेत प्राणिशास्त्र माजी विद्यार्थी आवेश पाटील यांनी मत्स्य प्रक्रिया व निखिल तवटे आयटी माजी विद्यार्थी यांनी हॉटेल व्यवसायाबाबत   मार्गदर्शन घेतले.

टॅग्स :uran-acउरण