शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

सुधागडमध्ये तरुणाच्या मृत्यूप्रकरणी एकास अटक, गुन्हेगारीत वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 05:30 IST

सुधागड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून खून, चो-या, दरोडा, विनयभंग आदी घटनांच्या प्रकारात वाढ झाली आहे. सुधागड तालुक्यातील चंदरगाव आदिवासीवाडी येथील तरुण अंकुश तांबड्या वाघमारे (२५), याला अमानुषपणे मारहाण करून, त्याचा खून केल्याची घटना नुकतीच घडली.

राबगाव / पाली : सुधागड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून खून, चो-या, दरोडा, विनयभंग आदी घटनांच्या प्रकारात वाढ झाली आहे. सुधागड तालुक्यातील चंदरगाव आदिवासीवाडी येथील तरुण अंकुश तांबड्या वाघमारे (२५), याला अमानुषपणे मारहाण करून, त्याचा खून केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.तांबड्या नवश्या वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलगा अंकुश वाघमारे व त्याची पत्नी सुशा यांचे घरात भांडण झाल्याने व तिला मारहाण केल्याने या गोष्टीचा राग मनात धरून, सुशा हिचे भाऊ नितीन बारकू हिलम व सचिन बारकू हिलम यांनी अंकुश वाघमारे यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांना दगडावर आपटले. यात गंभीर जखमी झालेल्या अंकुशला पेणच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले असता, गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांनी आदिवासीवाडीत भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. याबाबत पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा