शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

दीड कोटींचे खाद्यपदार्थ जप्त

By admin | Updated: October 27, 2016 03:27 IST

आरोग्यदायी दिवाळीकरिता रायगड जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून विशेष सतर्कता मोहीम जिल्ह्यात अमलात आणली आहे. गेल्या २५ दिवसांत

अलिबाग : आरोग्यदायी दिवाळीकरिता रायगड जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून विशेष सतर्कता मोहीम जिल्ह्यात अमलात आणली आहे. गेल्या २५ दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे घालून आतापर्यंत १ कोटी ४४ लाख ६१ हजार २३४ रुपये किमतीचा आरोग्यास अपायकारक मालाचा साठा जप्त केला. याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) डी.टी.संगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.दिवाळी सणाच्या निमित्ताने घरोघर लाडू, चिवडा, करंजी, चकली असे गोड-तिखट विविध पदार्थ आवर्जून तयार केले जातात. दिवाळीच्या या खाद्यपदार्थ तयार करण्याच्या परंपरेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यास घातक अशा खाद्यपदार्थांची विक्री छुप्या पद्धतीने बाजारात केली जाते. अशा आरोग्यास घातक पदार्थांमुळे आरोग्यास अपाय झाल्याची उदाहरणे देखील यापूर्वी निष्पन्न झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून ही विशेष मोहीम जिल्ह्यात अमलात आणण्यात आली आहे. १ कोटी ४४ लाख ६१ हजार २३४ रुपये किमतीच्या आरोग्यास अपायकारक मालाच्या या साठ्यामध्ये १ कोटी ३६ लाख ७९ हजार २४५ रुपये किमतीचे खाद्यतेल, ६ लाख ३२ हजार ३९९ रुपये किमतीची इन्स्टंट टी पावडर, १ लाख ४५ हजार १२२ रुपये किमतीचे सिट्रीक अ‍ॅसिड, ३ हजार ६८ रुपये किमतीचे खाद्यरंग आणि १ हजार ४०० रुपये किमतीची तयार मिठाई यांचा समावेश असल्याचे संगत यांनी सांगितले.आरोग्यास अपायकारक असण्याची शक्यता विचारात घेवून जिल्ह्यातून विविध खाद्यपदार्थांचे एकूण ६७ नमुने घेण्यात आले असून, ते परीक्षणाकरिता रासायनिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.प्रयोगशाळेच्या अहवालात आरोग्यास घातक निष्पन्न होणाऱ्या नमुन्यांच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या ६७ घेतलेल्या नमुन्यांमध्ये सर्वाधिक २५ नमुने हे खाद्य तेलाचे आहेत, तर उर्वरित १० दुधाचे, चार मिठाईचे, एक खव्याचा, दोन मसाल्याचे, ३ बेसन(चणा पिठाचे), चार रवा-मैद्याचे, दोन फ्रूट कलरचे, एक नमकीनचा, तीन फळांचे तर अन्य चार नमुने असल्याचे संगत यांनी सांगितले. दिवाळीच्या काळात जनतेकडून मोठ्या प्रमाणात मिठाई व तयार अन्नपदार्थ यांची खरेदी होवून त्याचे सेवन होत असते. मिठाई व इतर अन्नपदार्थ खरेदी व सेवन करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन संगत यांनी जनतेस केले आहे.शंका आल्यास सत्वर संपर्क साधामिठाई खरेदी करताना कोणत्याही प्रकारची शंका आल्यास सहाय्यक आयुक्त (अन्न) (रायगड-पेण), अन्न व औषध प्रशासन, दूरध्वनी क्रमांक ०२१४३/२५२०८४ व २५२०८५ येथे वा टोल फ्री क्र. १८००२२२३६५ येथे नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) डी.टी.संगत यांनी अखेरीस केले आहे.नागरिकांना आवाहन : मिठाई व इतर अन्नपदार्थ खरेदी व सेवन करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) डी.टी.संगत यांनी जनतेस केले आहे.