शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दीड तास तडफडली, महिलेची रस्त्यावरच प्रसूती, रायगड जिल्ह्यातील संतापजनक प्रकार; रुग्णवाहिका चालक नशेत तर्राट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 08:09 IST

Raigad: कर्जत तालुक्यातील बीड ग्रामपंचायतीमधील मोहिली आरोग्य उपकेंद्रात वेळेवर उपचार न मिळाल्याने एका आदिवासी महिलेची केंद्राच्या बाहेर दीड तास तडफडून प्रसूती झाली. सुदैवाने आई व बाळ सुखरूप आहे.

 नेरळ : कर्जत तालुक्यातील बीड ग्रामपंचायतीमधील मोहिली आरोग्य उपकेंद्रात वेळेवर उपचार न मिळाल्याने एका आदिवासी महिलेची केंद्राच्या बाहेर दीड तास तडफडून प्रसूती झाली. सुदैवाने आई व बाळ सुखरूप आहे. मात्र, या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.  रेणुका वाघमारे यांना शनिवारी सायंकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्याने त्या केंद्राकडे आल्या. त्यांच्यासोबतच्या महिलेने अंगणवाडी सेविका कामिनी सोनावणे यांना संपर्क केला. मात्र, त्यांनी डॉक्टर प्रीती करवंदे यांना न कळवता रुग्णसेविका अपर्णा अहिरकर यांना सांगितले. 

प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. करवंदे असतानाही सोनावणे यांनी अहिरकर व रुग्णवाहिकेला संपर्क केला. मात्र,  रुग्णवाहिकेचा चालक नितीन देशमुख दारूच्या नशेत होता. त्यामुळे दीड तास रेणुका या  प्रसूती वेदनांनी केंद्राबाहेर तडफडत होत्या. शेवटी असह्य झाल्याने त्या कोलमडून पडल्या. त्यानंतर त्या महिलेच्या एका नातेवाइकाने ग्रामपंचायत सदस्य हेमंत घरत यांना फोनद्वारे कळविले. त्यांनी डॉ. करवंदे यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर डॉ. करवंदे तेथे आल्या. मात्र, तोपर्यंत त्या महिलेची प्रसूती केंद्राच्या बाहेरच ग्रामस्थ महिलांनी केली. त्यामुळे त्या व बाळ थोडक्यात वाचले. त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आले.

मोहिली आरोग्य उपकेंद्राचा बेधुंद कारभारमोहिली आरोग्य उपकेंद्राची इमारत धोकादायक झाली आहे. स्टाफ नर्स नसल्याने सर्व जबाबदारी डॉ. प्रीती करवंदे यांच्यावर आहे. रुग्णवाहिकेचा चालक सतत दारूच्या नशेत असतो. जर एखाद्याचा जीव गेला तर याला जबाबदार लोकप्रतिनिधी असणार आहेत. आता तरी ही बाब गांभीर्याने घ्यावी व मनुष्यबळ पुरवावे, अशी मागणी  कष्टकरी संघटनेचे लक्ष्मण पालकर यांनी केली आहे.उपकेंद्रात स्टाफ कमी आहे. त्यात दिवसरात्र मलाच ड्यूटी करावी लागत आहे. याबाबत वरिष्ठांना कळवले आहे. मात्र, कोणीच दखल घेत नाही. एक जूनपासून संध्याकाळी उपकेंद्र बंद ठेवावे लागत आहे. जर मला वेळीच हा प्रकार कळला असता तर ही वेळ आली नसती.    - डॉ. प्रीती करवंदे,     वैद्यकीय अधिकारीसंबंधित प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. लवकरच नर्सची भरती करण्यात येईल. शासनाने शिपाई पद रद्द केले असल्याने ते भरता येणार नाही.     - अशोक कटारे, वैद्यकीय अधिकारी,     पंचायत समिती

टॅग्स :RaigadरायगडPregnancyप्रेग्नंसी