शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधी, शास्त्री जयंतीचे औचित्य साधत उरण काँग्रेसतर्फे २५ सफाई कर्मचारी, स्वच्छतादूतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2023 20:41 IST

या सत्कारामुळे आम्हाला काम करण्याची प्रेरणा, प्रोत्साहन मिळाले असल्याच्या भावना कामगारांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केल्या. 

मधुकर ठाकूर, उरण : कोरोना नव्हे तर इतर वेळीही जीव धोक्यात घालून नागरिकांची, जनतेची रांत्रदिवस सेवा करणारे स्वच्छता दूत,उनपच्या २५ सफाई कर्मचाऱ्यांचा महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून उरण कॉंग्रेसने यथोचित सत्कार केला.

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवारी (२) उरण शहर आणि तालुका कॉंग्रेसच्या वतीने उनपच्या सफाई कर्मचारी, स्वच्छता दूताच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.उरण तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष विनोद म्हात्रे आणि उरण शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्त्री सफाई कामगारांना साडी-चोळी तर पुरुषांना शर्ट,पॅन्टपीस देऊन सत्कार करण्यात आला.अनेक ठिकाणी सफाई कर्मचा-यांचा योग्य तो मान सन्मान होत नाही असे खंत व्यक्त करत सफाई कर्मचा-यांना मानसन्मान देण्याच्या हेतूने व त्यांच्या सुखदु:खात सहभागी होण्याच्या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहीती प्रकाश पाटील यांनी दिली.जीवाची तमा न बाळगता जनतेची रात्रंदिवस सेवा करणारे सफाई कामगारच खरे स्वच्छता दूत आहेत. असशा भावना ही काँग्रेसचे उरण शहराध्यक्ष प्रकाश पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.तर असा मानसन्मान याआधी कधीच मिळाला नाही. या सत्कारामुळे आम्हाला काम करण्याची प्रेरणा, प्रोत्साहन मिळाले असल्याच्या भावना कामगारांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केल्या. 

या आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर,उरण विधानसभा अध्यक्ष भालचंद्र घरत, महिला जिल्हा उपाध्यक्षा संध्या ठाकूर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अकलाख शिलोत्री, मच्छिमार नेते मार्तंड नाखवा, सेवादल रायगड जिल्हा सेक्रेटरी ज्ञानेश्वर पाटील, जेष्ठ कार्यकर्ते अली मुकरी, सेवादल जिल्हाध्यक्ष कमलाकर घरत, महिला अध्यक्ष रेखा घरत, कळंबूसरे ग्रामपंचायतचे सरपंच सारिका पाटील, उरण शहर उपाध्यक्ष नदाफ अकबर, महिला शहर अध्यक्ष अफशा मुकरी, उरण शहर उपाध्यक्ष गुफरान तुंगेकर, भेंडखळचे उपसरपंच दिपक ठाकूर,  सदानंद पाटील, अय्याज फकिह, सुनील काठे आदी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :uran-acउरण