शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

होळीनिमित्ताने गावागावांत वेध आट्यापाट्यांचे, मुलांमध्ये आजही उत्साह

By निखिल म्हात्रे | Updated: March 17, 2024 13:29 IST

आट्यापाट्या हा खेळ होळीच्या पार्श्वभूमीवर गावागावांत खेळला जातो. जिल्ह्यातील आदिवासीवाड्यांमध्ये हे खेळ मोठ्या प्रमाणात दिसून येतात. येत्या 24 मार्चला होळी हा सण आहे.

अलिबाग - मोबाईल, इंटरनेटच्या जगात वावरणाऱ्या पिढीला आजही मातीतील खेळ आवडत आहे. होळी सणानिमित्ताने खेळला जाणारा पारंपरिक आट्यापाट्या खेळ अनेक दिवसांपासून गावे, वाड्यांमध्ये सायंकाळच्या वेळेला खेळला जात आहेत. त्यामुळे आट्यापाट्या खेळ आजही तग धरून असल्याचे चित्र आहे.

आट्यापाट्या हा खेळ होळीच्या पार्श्वभूमीवर गावागावांत खेळला जातो. जिल्ह्यातील आदिवासीवाड्यांमध्ये हे खेळ मोठ्या प्रमाणात दिसून येतात. येत्या 24 मार्चला होळी हा सण आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही आट्यापाट्या हा पारंपरिक खेळ खेळला जात आहे. या खेळातून एक वेगळा आनंद मिळत असल्याने मोबाईलमध्ये रमणारी तरुणाई या खेळामध्ये मग्न असल्याचे चित्र आहे.खेळापासून अनभिज्ञ -आट्यापाट्या हा खेळ खेळाडूंच्या प्रमाणात चौकटी आखून त्यात विरुद्ध संघाच्या खेळाडूसाठी एक मर्यादित रेषांतील जागा ठरवून दिला जातो. त्यानंतर डाव सुरू होतो. होळीच्या आठ दिवसआधी लहान होळ्या उभारल्या जातात. त्या ठिकाणी सर्व तरुण मंडळी एकत्र येऊन आट्यापाट्या खेळ खेळतात. क्रिकेट, कबड्डी आदी मैदानी खेळांची वेगवेगळ्या प्रभावी माध्यमांतून जाहिरातबाजी होत असल्याने ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहेत. त्यामुळे आट्यापाट्या हे खेळ मागे पडू लागले आहेत. आजच्या पिढीपर्यंत आट्यापाट्या हा खेळ पोहचला नसल्याने याची काहींना माहिती नाही.

प्रत्येक सणांच्या कालावधीत वेगवेगळे खेळ खेळण्याची परंपरा अनेक वर्षांपासून आहे. गावे, गल्लीतील या मैदानी खेळांतून एक वेगळा आनंद मिळतो. शारीरिक व बौद्धिक क्षमता वाढीला या खेळांतून चालना मिळत असताना, चपळताही निर्माण होते.- यतीराज पाटील, क्रीडा शिक्षक

होळीच्या निमित्ताने आट्यापाट्या हा खेळ आम्ही गावातील सर्व मित्रमंडळी एकत्र येऊन खेळत होतो. त्यामुळे एक वेगळा उत्साह जाणवत होता. या खेळामुळे अंगात चपळाई निर्माण होत होती. काही गावे, वाड्यामध्ये आट्यापाट्या खेळ खेळला जात आहे. याचा आनंद आहे. कारण हा खेळ आजही तग धरून असल्याचे समाधान आहे.- निकेत मढवी. 

टॅग्स :Holiहोळी 2023Raigadरायगडalibaugअलिबाग