शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'मुंबई-गोवा महामार्गावर गणपतीपूर्वी एक लेन, तर दुसरी लेन डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार', रवींद्र चव्हाण यांनी दिली माहिती

By राजेश भोस्तेकर | Updated: July 14, 2023 11:03 IST

Mumbai-Goa Highway : गणपती पूर्वी मुंबई गोवा महामार्गाची एक लेन सुरक्षित वाहन चालविण्यासाठी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर दुसरी लेन ही डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

- राजेश भोस्तेकरअलिबाग - गणपती पूर्वी मुंबई गोवा महामार्गाची एक लेन सुरक्षित वाहन चालविण्यासाठी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर दुसरी लेन ही डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तांत्रिक अडचणीवर मात करून शासन, अधिकारी, ठेकेदार यांच्यात समन्वय करून मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करू असेही चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. महामार्गाच्या कामासाठी अद्यावत असे तंत्रज्ञान वापरले जात असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे गणपतीला जाणाऱ्या चाकरमानी यांचा प्रवास हा सुखकारक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा सुरू आहे. पनवेल ते झाराप असा एक दिवसाचा हा दौरा आहे. महामार्गावर पडलेल्या खड्यांची पाहणी करीत मंत्री, अधिकारी यांचा दौरा सुरू आहे. यावेळी वाकण येथे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बातचीत केली. आमदार प्रशांत ठाकूर, महामार्ग अधिकारी, ठेकेदार यांसह पत्रकार या दोऱ्यात सहभागी आहेत.

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपादरी करण्याचे काम २०१० साली सुरू झाले. मात्र बारा वर्ष झाले तरी आजही हा महामार्ग रखडलेला आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना आजही प्रवाशांना खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने हा महामार्ग डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे महामार्ग पूर्ण करण्याकडे जातीने लक्ष देत आहेत. महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी नवे ठेकेदार नेमले आहेत. मात्र कामाचे बिल बँकेमार्फत हे पूर्वीच्या ठेकेदार कडे जात असल्याने अडचणी येत आहेत. याबाबत ठेकेदार, अधिकारी, शासन यांच्यात बैठक घेऊन हा प्रश्न सोडविला जात आहे. तांत्रिक अडचणी असल्या तरी समन्वयाने काम केले जात असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.

मुंबई गोवा महामार्ग हा गणपती पूर्वी एक लेन पूर्ण होणार असल्याचे म्हटले असून दुसरी लेन डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार असल्याचा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. कशेडी भोगद्या बाबतही महामार्ग प्रमाणे तांत्रिक अडचणी आहेत. मात्र तोही सुरू होईल असे म्हटले आहे. महामार्गाच्या कामासाठी अद्यावत अशा दोन मशिनी आणल्या आहेत. या मशीन द्वारे अर्धा किलोमिटर रस्ता दिवसभरात पूर्ण होत आहे. तर राज्यात किंवा इतर राज्यात अशा मशीन असतील तर त्या आणण्याच्या सूचना ठेकेदार याना दिल्या आहेत. यासाठी शासनाचे पूर्ण सहकार्य राहणार असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Raigadरायगडhighwayमहामार्ग