शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

‘बीडीडीएस’मधील अधिकाऱ्यांना बाप्पा पावला, सहा वर्षांपासूनचा फरक मिळणार

By जमीर काझी | Updated: September 8, 2022 10:16 IST

सातव्या वेतन आयोगानुसार ‘बीडीडीएस’मधील अधिकारी, अंमलदारांना त्यांच्या मूळ वेतनाच्या २५ टक्के, तर वाहन चालकांना मूळ वेतनाच्या १५ टक्के जोखीम भत्ता म्हणून दिला जाणार आहे.

अलिबाग :  घातपाती कृत्य व घडामोडींना प्रतिबंध करण्यासाठी जीव धोक्यात घालून कार्यरत असलेल्या राज्य पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकातील (बीडीडीएस) अधिकारी व अंमलदारांना गणेशोत्सवाच्या  काळात अनोखी भेट मिळाली आहे. गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेला त्यांचा प्रोत्साहन  (जोखीम) भत्ता देण्याच्या प्रस्तावाला गृह विभागाने अखेर हिरवा कंदील दाखविला आहे. राज्यातील  ११ पोलीस आयुक्तालये व ३३ जिल्हा अधीक्षक कार्यालयांच्या अखत्यारित या विभागात कार्यरत असलेल्या हजारो पोलिसांना त्याचा लाभ मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार ‘बीडीडीएस’मधील अधिकारी, अंमलदारांना त्यांच्या मूळ वेतनाच्या २५ टक्के, तर वाहन चालकांना मूळ वेतनाच्या १५ टक्के जोखीम भत्ता म्हणून दिला जाणार आहे. १ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर मुंबई पोलीस दलात ‘बीडीडीएस’ची स्थापना केली. त्यांच्यामुळे अनेक  घातपाती कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले. अनेक वेळा जीव धोक्यात घालून काम करावे लागते. बॉम्ब किंवा घातपाती वस्तू निकामी करताना काहीवेळा त्यांना गंभीर इजा होण्याचा धोका असतो, त्यामुळे त्यांना मूळ वेतनाच्या ५० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता मिळत होता. सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर वेतनश्रेणीतील बँड पे व ग्रेंड पे यांच्या बेरजेच्या ३० टक्के रक्कम भत्ता दिला जात होता. मात्र, २०१६ पासून लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगात ‘ग्रेड पे’ ही संकल्पना संपुष्टात आल्याने त्यांना दिला जाणारा जोखीम भत्ता बंद झाला होता. त्याबाबत   पाठपुरावा केला जात होता. मुख्यालयातून  त्याबाबत अखेरचा  सुधारित  प्रस्ताव २९ जुलैला पाठविला. त्याला गृह विभागाने मान्यता दिली आहे.

...तर भत्ता नाही ‘बीडीडीएस’मध्ये कार्यरत असेपर्यंतच संबंधित अधिकारी, अंमलदारांना जोखीम भत्ता मिळेल, बदली होऊन ते मूळ घटकात परत गेल्यास त्यांना हा भत्ता लागू होणार नाही. त्याचप्रमाणे गडचिरोली, अहेरी व गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील कार्यरत बीडीडीएस पथकाला वेतनाच्या दीड दराने वेतन व महागाई भत्ता मिळत असल्याने त्यांना त्याचा लाभ होणार आहे.

सातवा वेतन आयोगानुसार ‘ग्रेड पे’ संकल्पना बंद झाल्याने या पथकाला जोखीम भत्ता देण्याबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्याबाबतची मागणी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी नव्याने प्रस्ताव बनवून सरकारकडे पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने भत्ता दिला जाईल.- अनुपकुमार सिंह, अपर महासंचालक, प्रशासन, पोलीस मुख्यालय

टॅग्स :BDDS TeamबीडीडीएसalibaugअलिबागPoliceपोलिस