शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा; रेल्वे प्रशासनाने खड्ड्यातील पाणी उपसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:18 IST

नवीन पनवेल येथील पंचशीलनगरला लागून असलेल्या रेल्वेच्या फलाट रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून सोमवारी तीन मुलींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने खड्ड्यातील पाणी उपसण्याचे काम सुरू केले आहे.

पनवेल : नवीन पनवेल येथील पंचशीलनगरला लागून असलेल्या रेल्वेच्या फलाट रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून सोमवारी तीन मुलींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने खड्ड्यातील पाणी उपसण्याचे काम सुरू केले आहे. मंगळवारी याप्रकरणी साई प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड व एस. एन. नाईक अँड ब्रदर्स या ठेकेदारांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पनवेल रेल्वे स्टेशनच्या फलाट रुंदीकरण व सबवेचे काम सध्या सुरू आहे. जवळपास ३२ कोटी रु पयांचे हे काम असून २०१५ पासून सुरू आहे. रेल्वेच्या रुंदीकरणासाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सोमवारी याच खड्ड्यात बुडून ८ ते १३ वयोगटातील तीन मुलींचा बुडून मृत्यू झाला. या तिन्ही लहान मुलींच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारालाच जबाबदार धरले जात आहे.दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने खड्ड्यातील पाणी पंपाच्या साहाय्याने उपसण्यास सुरु वात केली आहे. हे पाणी यापूर्वीच ठेकेदाराने काढले असते तर तीन मुलींचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. ठेकेरादाने या ठिकाणी सुरक्षा क्षक, सुपर वायझर यापैकी कोणाचीही नेमणूक केलेली नव्हती.सोमवारी रात्री उशिरा या तिन्ही मुलींचे शवविच्छेदन करण्यात आले. धोसले कुटुंबीयांचे हातावर पोट असल्याने परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे तिन्ही मुलींचे मृतदेह गावी अमरावतीला नेण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. अखेर खांदेश्वर पोलिसांनी पैशांची मदत करून रु ग्णवाहिकेतून शव अमरावती येथे अंत्यविधीसाठी पाठवले.ठेकेदारा विरोधात गुन्हापनवेल रेल्वे स्थानकाजवळील खड्ड्यात बुडून मृत्यू झालेल्या तीन मुलींच्या प्रकरणी साई प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड व एस. एन. नाईक अँड ब्रदर्स यांच्याविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकाजवळील खड्ड्यात बुडून प्रतीक्षा धोसले, रोहिता धोसले, रेश्मा धोसले यांचा सोमवारी मृत्यू झाला. फलाट रुंदीकरणांचे काम सुरू असताना ठेकेदाराच्या निष्काळजीमुळे हा प्रकार घडला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी