शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्टोबर हीटने प्रचारकांचा काढला घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 23:23 IST

जोर वाढला : कडक उन्हाच्या तडाख्याने नेते, कार्यकर्ते हैराण

पाली : सुधागडात पावसाने जरी उघडीप दिली असली तरी आॅक्टोबर हीटमुळे तालुक्यातील प्रचारकर्त्यांना चांगलाच घाम फु टत आहे. तापमानाबरोबर राजकारणाचाही पारा चढला आहे. प्रचारांचा जोर वाढला आहे. कडक उन्हाच्या तडाख्याने नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हैराण झाले आहेत. उन्हापासून बचाव व्हावा याची काळजी घेत नेते मंडळींनी प्रचार सुरू केला आहे.

पेण मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सर्वच पक्षांचे नेते व पदाधिकारी रस्त्यांवर उतरले आहेत; मात्र या नेत्यांना उन्हाचा फटका बसत आहे. दोन्ही मतदारसंघातील उमेदवार सकाळी लवकर बाहेर पडतात. तालुक्यातील प्रत्येक गावात कधी सभा, तर कधी प्रचारफेरी काढावी लागते. तर शहरीभागात महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांकडून प्रचारफेरी काढली जात आहे. सकाळी आठला उन्हाचा तडाखा जाणवतो. नऊ वाजता प्रचारफेरीत सहभागी झालेले नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अंगात घामाच्या धारा वाहतात. उन्हामुळे डीहायड्रेशन होऊ नये याची काळजी घेतली जाते आहे.

उमेदवार, आमदार व काही पदाधिकाऱ्यांची चारचाकी वाहने एसी आहेत. एसीतून बाहेर पडल्यावर उन्हाचा चटका बसतो. तर उन्हातून पुन्हा वाहनात बसल्यावर एसी सुरू झाल्यावर शरीराचे तापमान व्यवस्थित ठेवावे लागते. उन्हाचा त्रास कमी होण्यासाठी प्रचारफेरीत सर्वजण टोप्या घालत असल्याचे दिसून येत आहे. आघाडीचे नेते पांढरी गांधी टोपी अथवा कॅप घालतात, तर महायुतीचे नेतेमंडळी भगव्या टोप्या वापरतात. उमेदवारांचा सलग धावता दौरा असल्याने पदयात्रा आणि छोट्या सभा त्यांना घ्याव्या लागतात.

सभा शक्यतो सावलीच्या ठिकाणी अथवा मंदिरात घेतल्या जात आहेत. राजकीय नेत्यांपेक्षा कार्यकर्ते भलतेच बिझी झाले आहेत. सध्या उमेदवार हे उघड्या चारचाकी वाहनातून आपला प्रचार करत असल्याचे पहायला मिळते.

हलक्या जेवणावर भरअतिथंड पाण्याने अनेक नेत्यांना घशाचा त्रास सुरू झाला आहे. नेतेमंडळींना भाषणे करावी लागत असल्याने अतिथंड पाणी पिण्याचे टाळत आहेत, तर दुपारी सर्वच नेते मंडळी शाकाहारी, हलके जेवण घेतात. जेवणात काकडी, टोमॅटो या सॅलडबरोबर फळांचा आहारात समावेश केला जात आहे. चहाऐवजी सरबत व ज्यूसला प्राधान्य दिले जात आहे..