शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांमध्ये बालके पोषण आहाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:48 IST

येथे बालकांसाठी शासनाच्या योजनेतून अंगणवाड्या चालविल्या जातात, परंतु त्या ठिकाणी येणाºया बालकांना पोषण आहार मात्र शासन देत नाही.

अजय कदम ।माथेरान : येथे बालकांसाठी शासनाच्या योजनेतून अंगणवाड्या चालविल्या जातात, परंतु त्या ठिकाणी येणाºया बालकांना पोषण आहार मात्र शासन देत नाही. अशी परिस्थिती माथेरानमध्ये निर्माण झाली असून अंगणवाडीमध्ये येणा-या बालकांना पोषण आहार पोहचविण्याची जबाबदारी असलेला शहरी एकात्मिक बालविकास विभाग उदासीन असल्याचे दिसून येत आहे.२००९ मध्ये माथेरानमध्ये अंगणवाडी सुरू केली.शासनाच्या शहरी भागासाठी असलेल्या एकात्मिक बालविकास विभागाच्या माध्यमातून चालविण्यात येणाºया तीन अंगणवाड्यांमध्ये माथेरानमधील ४५ बालके येत आहेत. त्यांना शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागाकडून पोषण आहार दिला जात होता. शासनाच्या बदलत्या धोरणामुळे माथेरान या पर्यटनस्थळी असलेल्या अंगणवाडी केंद्रावर बालकांना मागील जानेवारी महिन्यापासून पोषण आहार पुरविला जात नाही. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांची संख्या रोडावली आहे. माथेरानमध्ये वाल्मीकीनगर, मुस्लीम मोहल्ला आणि वन ट्री हिल या तीन नावाने अंगणवाडी केंद्रे चालविली जात आहेत. त्या प्रत्येक अंगणवाडी शाळेत साधारण १५-१८ बालके येत असून शून्य ते चार वयोगटातील बालकांची संख्या त्यात अधिक आहे. त्या सर्व बालकांवर लक्ष ठेवण्यासाठी २००९ पासून तीन सेविका आणि तीन मदतनीस यांची नियुक्ती केली होती, मात्र आज घडीला मदतनिसाचे एक पद रिक्त आहे.अंगणवाडीमध्ये पोषण आहार मिळत नसल्याने बालकांना घरातून खाऊ घेऊन यावे लागते.त्यामुळे अंगणवाडीमध्ये येणाºया बालकांच्या संख्येत घट झाली आहे. शासन प्रत्येक बालकाला दरडोई ४ रु पये ९२ पैसे असे अनुदान बचत गटांना देते, त्या बदल्यात खाऊ शिजवून देण्याचे काम बचत गटांनी करावे अशी संकल्पना आहे. माथेरानमधील तिन्ही अंगणवाडी शाळेत येणाºया बालकांना जानेवारी २०१७ पासून पोषण आहार दिला जात नाही. त्याची माहिती घेतली असता बचत गटांना प्रत्येक बालकासाठी दिले जाणारे अनुदान हे बाजारभाव विचार करता न परवडणारे आहे. त्यात खिचडी शिजवून देण्यासाठी आणि अन्य खाऊ उकडून देण्यासाठी लागणारा गॅस यांचा ताळमेळ बसत नाही. त्यात माथेरानसारख्या ठिकाणी आर्थिक गणिते जुळविताना अडचणी येते.