शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
2
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
3
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
4
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
5
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
6
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
7
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
8
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
9
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
10
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
11
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
12
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
13
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
14
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
15
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
16
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
18
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
19
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
20
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण मंडळाकडून परवाना नूतनीकरणासाठी नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 05:00 IST

महाडच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालयाकडून परवाना घेतलेल्या व्यावसायिकांना परवाना नूतनीकरणासाठी समज नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

दासगाव : महाडच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालयाकडून परवाना घेतलेल्या व्यावसायिकांना परवाना नूतनीकरणासाठी समज नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये हॉटेल, दगडखाणी, आणि घनकचरा वाहतूकदार यांचा समावेश आहे. देण्यात आलेले वेळेत परवाने नूतनीकरण न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.हॉटेल व्यावसायिक, स्टोन क्रशर, आणि घनकचरा वाहतूकदार यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियामानुसार परवाने घेणे बंधनकारक आहे. महाड तालुक्यातील अशा परवानाधारकांची मुदत संपल्याने हे परवाने नूतनीकरण करणे आवश्यक आहे. हॉटेलमधील सांडपाणी व्यवस्थापन, स्टोन क्रशरवरील धुळीचे नियोजन, आणि घनकचरा वाहतूक करत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन होणे आवश्यक असते. याकरिता परवाने दिले जातात. हे परवाने नूतनीकरण करून घेण्याकरिता या नोटिसा बजावल्या आहेत. महाडमध्ये १३ घनकचरा वाहतूकदार, ४८ हॉटेल व्यावसायिक, ३७ स्टोन क्रशर एवढ्या व्यावसायिकांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.दिलेल्या मुदतीत हे नूतनीकरण करून घेणे आहे. मात्र, व्यावसायिकांनी नूतनीकरण न करून घेतल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले. पर्यावरण संरक्षण कायदा, जलप्रदूषण कायदा, आणि वायुप्रदूषण कायद्याप्रमाणे ही कारवाई केली जाणार आहे.महाड परिसरातील हॉटेल व्यावसायिक, स्टोन क्रशर, आणि घनकचरा वाहतूकदार यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात येणारे परवाने नूतनीकरण करून घेणे जसे बंधनकारक आहे, तसे परवाना नियमांचे पालन देखील करणे आवश्यक आहे.- प्रकाश ताटे,क्षेत्र अधिकारी, प्रदूषण मंडळ

टॅग्स :Raigadरायगड