शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षांची होळी नको - मानकवळे

By admin | Updated: March 11, 2017 02:20 IST

होळी हा सण सर्वत्र साजरा क रण्यात येतो; परंतु होळीसाठी दरवर्षी हजारो वृक्षांची तोड केली जाते आणि त्याचा परिणाम निसर्गावर होताना दिसत आहे.

- सुनील बुरुमकर, कार्लेखिंडहोळी हा सण सर्वत्र साजरा क रण्यात येतो; परंतु होळीसाठी दरवर्षी हजारो वृक्षांची तोड केली जाते आणि त्याचा परिणाम निसर्गावर होताना दिसत आहे. त्याकरिता निसर्गप्रेमींनी याची जाण ठेवून झाडांचे जतन होण्यासाठी या वृक्षतोडीच्या विरोधात आवाज उठविला आहे. असेच एक निसर्गप्रेमी प्रा. उदय मानकवळे हे निसर्गासाठी झटत असून, वृक्षतोड थांबविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ‘झाडे तोडण्यापेक्षा झाडे लावा’ हा संदेश ते देत आहेत.हिंदू संस्कृतीप्रमाणे या सणाला पुरातन कथांचा आधार असतो आणि त्यानुसार आपण सण साजरे करत असतो. पुरातन दंतकथांच्या आधारावर ज्या दिवशी वाईट किंवा दृष्ट प्रवृत्तीचा नाश होतो त्याची आठवण आणि आपल्याकडून वर्षभरातून कळत- नकळत वाईट गोष्टी घडलेल्या असतात. त्यापासून माफी मागून नवीन वर्ष सुखाचे आणि चांगले जावो, अशी प्रार्थना करतो. हा त्या मागेचा हेतू असतो. होळी हा सण अगदी पुरातन काळापासून परंपरागत पद्धतीने म्हणजे जिवंत झाडे तोडून ती जाळून होळी करत; पण आपण त्या गोष्टीकडे कधी गांभीर्याने पाहिले नाही. झाडे तोडल्यामुळे होणारा निसर्गाचा ऱ्हास, त्यामुळे आपण आज त्याचे परिणाम भोगत आहोत. याच विरोधात गेली २० वर्षे पेण येथील वृक्षमित्र प्रा. उदय मानकवळे हे आवाज उठवत आहेत; परंतु त्यांना तेवढे यश मिळत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. शासनामार्फत याचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. मानकवळे हे स्वत: दरवर्षी दहा हजार झाडांची स्वखर्चाने निर्मिती करून ते ती झाडे लावण्यासाठी दान करतात. तसेच पत्रके वाटून गावातील किंवा वाडीमध्ये जाऊन झाडांविषयी महत्त्व पटवून वृक्षतोड होऊ नये यासाठी जनजागृती करण्याचे काम गेली कित्येक वर्षे करीत आहेत.मानकवळे यांच्या म्हणण्यानुसार पर्यावरण संतुलनासाठी मनुष्यप्राणी व इतर जीवजंतूंना जगण्यासाठी किमान ३३ टक्के भूभागावर जंगले किंवा नैसर्गिक एको सिस्टीम असणे आवश्यक आहे; परंतु महाराष्ट्रात केवळ १९ टक्के वनक्षेत्र अस्तित्वात आहे आणि ते घटत घटत १६ टक्क्यांवर येऊन थांबले आहे. नैसर्गिक असंतुलनामुळे विविध आजारांना आपण बळी पडत आहेत. होळीमध्ये जिवंत झाडे तोडून जाळली जाणारी झाडे जाळत नाहीत, तर मानवाचे भविष्य, येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य जाळत आहेत. त्यामुळे हे टाळून सण आनंदाने व आरोग्याने साजरे करावे, असे त्यांनी आवाहन केले आहे. वृक्ष संवर्धनाची गरज1प्रत्येक झाडाचे जतन केले पाहिजे, कारण प्रत्येक झाडामध्ये ईश्वर आहे आणि झाडाची कत्तल करणे म्हणजे ईश्वराची कत्तल केल्यासारखी आहे, त्यामुळे वृक्ष संवर्धन महत्त्वाचे आहे. 2रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून पथक नेमून वृक्षतोड करू नये याबाबत माहिती देण्याचे काम वन विभागामार्फत चालू आहे. तसेच अलिबाग तालुक्यात संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्यामार्फतही जनजागृती केली जात आहे. 3‘जंगल वाचले तर जीवन वाचेल’ अशी माहिती गावागावातून दिली जात आहे. यावर्षी २५ हजार पत्रके छापून ती शाळा, कॉलेज, बसस्टँड व अन्य ठिकाणी वाटली जात आहेत. तसेच रात्रीची गस्तसुद्धा घातली जात आहे.