शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सतत हात धुवा सांगणाऱ्यांच्या नळाला नाही पाणी; मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 00:54 IST

- अरुण जंगम  म्हसळा : मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत मेंदडी, वारळ व खरसई ही तीन उपकेंद्रे, १६ ग्रामपंचायती ...

- अरुण जंगम म्हसळा : मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत मेंदडी, वारळ व खरसई ही तीन उपकेंद्रे, १६ ग्रामपंचायती व छोटी-मोठी २४ गावे, वाड्या असून सुमारे १४,००० लोकसंख्येला या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सेवा मिळत असते. प्रति महा. सरासरी १००० ते १२०० रग्णांवर उपचार होत असतात. कोरोना काळात सातत्याने हात धुवा, असे जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत सांगण्यात येत आहे. मात्र मेंदडी आरोग्य केंद्रातील रुग्णांना व कर्मचाऱ्यांना हात धुण्यासाठी पाणी नसण्याची केविलवाणी परिस्थिती आहे.

आपल्या हद्दीतील नागरिक स्त्रिया आणि मुलांच्या आरोग्याकरता आखलेले राष्ट्रीय कार्यक्रम हिवताप, हत्तीरोग, टी.बी., लैंगिक रोग आणि एड्स वगैरे आजारांचे ताप, गरोदरपण, बाळंतपण आणि बाळंतपणानंतर लागणारी आरोग्य सेवा या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून पुरवल्या जातात. या विविध आरोग्य सेवांसोबतच मुंबईवरून सुमारे ६५०० आलेल्या चाकरमान्यांना क्वारंटाइन करणे व पश्चात अन्य सेवा पुरवत असतानाच प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे वॉश बेसीन, बाथरूम व अन्य ठिकाणी नळांना पाणीच नसल्याची तक्रार काही रुग्णांनी ‘लोकमत’कडे के ली.

तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोरोनात गुंतल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र मेंदडीच्या दवाखानाच्या मूलभूत व प्राथमिक सोयी-सुविधांकडे जिल्हा परिषद आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत आहे. दवाखान्याबाहेरील एक नळ सुरू आहे तर अंतर्गत वितरण व्यवस्था अगर स्टोअरेज टाक्या रिकाम्या असून नळाला पाणी नाही. यामुळे येथील रुग्णांचे आणि कर्मचाºयांचे हाल होत आहेत.

मागील रुग्ण कल्याण समितीच्या दोन सभांतून प्राथमिक आरोग्य केंद्र मेंदडीसाठी अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्था दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत व्हावा याबाबत ठराव घेतले. यासाठी अनेक वेळा पदाधिकारी व अधिकाºयांकडे पाठपुरावा केला, क्लार्क तीन महिन्यांपासून कार्यालयात येत नसल्यामुळे काम थांबलेले असल्याचे सांगण्यात आले.- महेंद्र पारेख, रुग्ण कल्याण समिती, प्रा.आ. केंद्र, मेंदडी

जिल्हा परिषद प्रशासनामार्फत जिल्ह्यातील आरोग्य सेवक-सेविकांचे वेतन प्रलंबित नाही. मेंदडी ग्रामपंचायत हद्दीत पाणीटंचाई आहे असे समजते.- डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. अलिबाग

म्हसळा तालुक्यातील मेंदडी ग्रामपंचायत हद्दीत सुरळीत पाणीपुरवठा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मेंदडी येथील अंतर्गत वितरण व्यवस्थेत काही अडचणी असतील.- युवराज गांगुर्डे, उपअभियंता, ग्रा. पा. पुरवठा, म्हसळा

टॅग्स :Raigadरायगड