शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात नऊ कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 00:21 IST

निखिल म्हात्रे अलिबाग : उन्हाच्या झळा आता तीव्र होत आहेत. जिल्ह्यातील पाणीटंचाईही आता डोके वर काढण्याच्या तयारीत आहे. पाणीटंचाईपासून ...

निखिल म्हात्रेअलिबाग : उन्हाच्या झळा आता तीव्र होत आहेत. जिल्ह्यातील पाणीटंचाईही आता डोके वर काढण्याच्या तयारीत आहे. पाणीटंचाईपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नऊ कोटी ३९ लाख दहा हजार रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सातत्याने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, पाणीटंचाईची समस्या पूर्णत: कधी संपुष्टात येणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा आराखडा तयार केला जातो. मात्र, त्यातील कोट्यवधी रुपये खर्चच होत नसल्याचे मागील सात वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता दिसून येते.रायगड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी साडेतीन हजार मिलीमीटर इतका पाऊस पडतो; परंतु मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही त्याचे योग्य नियोजन करण्यात येत नसल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊन त्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. जिल्ह्यात पेण, कर्जत, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये टंचाईची तीव्रता अधिक असते. या भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. टँकर वेळेवर सुरू झाले नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी तेथील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. काही ठिकाणी तर नागरिकांना पैसे खर्च करून पाणी आणावे लागते.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीटंचाई कृती आराखडाही दरवर्षी तयार केला जातो. प्रामुख्याने टंचाई निवारणासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. यामध्ये टँकरने पाणीपुरवठा करणे, नवीन विंधन विहिरींची कामे करणे, विंधन विहिरींची दुरुस्ती करणे, नळ पाणी योजनांची तात्पुरती दुरुस्ती, अशी कामे प्रस्तावित असतात. जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आाणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून ही कामे केली जातात. मागील सात वर्षांतील टंचाई कृती आराखडा आणि प्रत्यक्ष खर्च याच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर छोटी-मोठी कामे वगळता अन्य निधी तसाच पडून राहतो.।प्रक्रियेमध्ये वेळ जात असल्याने विलंबटँकर किंवा बोअरवेल विहीर दुरुस्तीची मागणी आली की, त्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवला जातो. प्रशासनाची मंजुरी मिळाल्यानंतर कामाचे अंदाजपत्रक तयार केले जाते. त्यानंतर कामासाठी ठेकेदार नेमला जाऊन कामाला सुरुवात होते. या प्रक्रियेमध्ये बराच कालावधी जातो. यातच उन्हाळ्याचे दिवस निघून जातात आणि कामे तशीच राहतात. कायदेशीर प्रक्रि या दिवाळीपूर्वीच पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी ‘लोकमत’कडे व्यक्तके ले.।वर्ष प्रस्तावित आराखडा प्रत्यक्ष खर्च२०१२ - १३ ६ कोटी ६ लाख ७५ हजार २ कोटी १६ लाख ५३ हजार२०१३ - १४ ६ कोटी ३ लाख ९२ हजार १ कोटी ६० लाख ३ हजार२०१४-१५ ६ कोटी ८९ लाख ४४ हजार १ कोटी ४७ लाख १ हजार२०१५-१६ ७ कोटी ८८ लाख ८० हजार १ कोटी १५ लाख२०१६-१७ ६ कोटी २५ लाख १० हजार १ कोटी २२ लाख ९५ हजार२०१७-१८ ८ कोटी ३३ लाख १ हजार ३ कोटी२०१८-१९ ९ कोटी ४० लाख ९९ हजार ३ कोटी ३ लाख ४९ हजार