शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वर्षी रायगडचे नवे आणि प्रसन्न रूप पाहायला मिळेल - संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:33 IST

रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पुढील वर्षी गडावरील फसरबंदी, ८४ तलावांची सफाई, तटबंदीची दुरुस्ती आदी कामे पूर्ण झालेली असतील. रायगडचे एक नवे आणि प्रसन्न रूप शिवभक्तांना पाहावयास मिळेल, असा विश्वास खा. संभाजीराजे यांनी व्यक्त केला.

- संदीप जाधवमहाड : रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पुढील वर्षी गडावरील फसरबंदी, ८४ तलावांची सफाई, तटबंदीची दुरुस्ती आदी कामे पूर्ण झालेली असतील. रायगडचे एक नवे आणि प्रसन्न रूप शिवभक्तांना पाहावयास मिळेल, असा विश्वास खा. संभाजीराजे यांनी व्यक्त केला. बुधवारी किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.खा. युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे, राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, फिजीचे राजदूत रोंढीरकुमार, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद छत्रे, शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, पानिपत येथील रोड मराठा समाजाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.मंगळवारी गडपूजनाने शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. खा. संभाजीराजे छत्रपती आणि युवराज शहाजीराजे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून त्याचप्रमाणे मेघडंबरीतील शिवपुतळ्यावर सुवर्ण मोहोरांचा अभिषेक करून राज्याभिषेक साजरा करण्यात आला. त्यानंतर मेघडंबरी ते शिवसमाधीपर्यंत भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. शिवकालीन वेशामध्ये उपस्थित असलेले, भगवा ध्वज हाती घेऊन शिवरायांचा जयघोष करणारे शिवभक्त रायगडावर शिवकालच अवतरल्याची प्रचिती देत होते.आठ दिवसांपासूनच संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीचे कार्यकर्ते या सोहळ्याची तयारी करीत होते. यावेळी गडावरील उत्खननामध्ये सापडलेल्या विविध शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. वाहतूककोंडी होऊ नये यासाठी पाचाड नाक्यावरच चारचाकी वाहने थांबण्यात येत होती. त्यामुळे शिवभक्तांना पाचाड नाका ते चित्तदरवाजापर्यंत चार किमी पायपीट करावी लागली.

टॅग्स :Raigadरायगड