शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इर्शाळवाडी दरडग्रस्तांना नवीन वर्षाची भेट, ३ गुंठे जमिनीवर घर; मे २०२४ पर्यंत गाव वसणार

By राजेश भोस्तेकर | Updated: January 1, 2024 14:12 IST

सिडकोद्वारे ४४ घरे उभारण्याचे काम युद्धपातळीवर...

अलिबाग : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीतील दरडग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या कामाला आता वेग आला आहे. चौकमधील मानिवली येथे अडीच हेक्टर जागेत ४४ घरे बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. आपद्ग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी तीन गुंठे जागेवर सिडकोच्या माध्यमातून ही घरे बांधून दिली जाणार आहेत. यासाठी प्री कास्ट तंत्रज्ञान वापरले जात असल्याने हे काम कमी वेळात होणार आहे. त्यामुळे नववर्षात इर्शाळवाडी गाव हे मे अखेरपर्यंत वसले जाणार आहे. गावात शाळा, समाजमंदिर, खेळाचे मैदान या सुविधाही पुरवल्या जाणार आहेत. अंतर्गत रस्ते, पाणी आणि वीज आदी सुविधाही पुरवण्यात येणार आहेत. 

चौक मानिवलीत २.६० हेक्टर जागाखालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या आदिवासीवाडीवर १९ जुलैच्या रात्री दरड कोसळली. या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला तर ८४ जणांचा शोध लागला नसल्याने त्यांना शासनाने मृत घोषित केले आहे. तेथील परिस्थिती पाहता या कुटुंबांचे स्थलांतर करणे गरजेचे होते. युती सरकारने इर्शाळवाडीचे पुनर्वसन करण्यासाठी तातडीने पावले उचलली गेल्याने नववर्षाच्या मध्यान्ह्यात बाधित दरडग्रस्त हे आपल्या नव्या घरात प्रवेश करणार आहेत. 

इथं पाच एकर जागेमध्ये ४४ घरे उभारली जात आहेत. हॉल, किचन, बेडरूम, स्वच्छतागृह आणि मोकळी जागा अशी घरांची रचना असेल. घरे काँक्रिटची असतील. छप्पर स्लॅबचे असेल. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र नाला असेल, ज्यामुळे घरांना धोका होणार नाही. याशिवाय इतर नागरी सुविधांचादेखील यात समावेश आहे. सहा महिन्यांत या घरांचे काम पूर्ण होईल.- उत्तम नागटिळक, प्रकल्प व्यवस्थापक

काय आहे प्री कास्ट?प्री कास्ट तंत्रज्ञान म्हणजे कमी वेळात अधिक काम. घर तयार करण्यापूर्वी त्याची संकल्पना तयार केली जाते. त्यानुसार घराचे वेगवेगळे भाग काँक्रीटमध्ये तयार केले जातात आणि ते जोडून घर उभे राहते. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारHomeसुंदर गृहनियोजनcidcoसिडको