शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा नवा उच्चांक; ३४ जण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 01:30 IST

तालुक्यात ९९० रुग्ण

कर्जत : कर्जत तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गणेशोत्सवानंतर कोरोनाबाधितांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. शुक्रवारी रुग्णसंख्येचा उच्चांक झाला होता. शनिवारी ३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने नवा उच्चांक झाला आहे.

आजपर्यंत तालुक्यात ९९० रुग्ण आढळले असून, तालुका रुग्णसंख्येच्या बाबतीत हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. ७६१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले आहेत. शनिवारी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ४४ वर गेली आहे. आज शहरात आठ रुग्ण सापडले आहेत, परंतु तालुक्यातील ग्रामीण भागात सापडलेल्या रुग्णसंख्येने भीतिदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

कर्जत शहरातील ३७ वर्षांच्या तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे, तर मुद्रे खुर्दमधील ६० वर्षीय महिलेचा, तसेच मुद्रे बुद्रुकमधील नेमिनाथ सोसायटीमध्ये राहणाऱ्या ४२ वर्षांच्या महिलेचा व १२ वर्षांच्या मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. विठ्ठलनगरमधील ५४ वर्षीय व्यक्तीचा, तसेच सिद्धिविनायक प्लाझा इमारतीत राहणाºया ७० वर्षीय वयस्कर महिलेचा तिच्या ४३ वर्षीय मुलाचा व ३८ वर्षांच्या सुनेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पोसरीमधील ३४ वर्षांच्या युवकालाही कोरोनाची लागण झाली आहे. बीडमधील ४६ वर्षीय महिला व ४५ वर्षीय व्यक्तीसुद्धा कोरोनाबाधित झाली आहे.

हालीवलीमधील २८ वर्षांच्या महिलेचा व तिच्या ९ वर्षांच्या मुलाचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. चांदईमधील ४८ वर्षांची व्यक्ती व ४३ वर्षांच्या महिलेला, तसेच पिंपळपाडा येथील ४८ वर्षांच्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली आहे. गुढवणमधील २४ वर्षीय तरुण व खांडसमधील २३ वर्षीय तरुणी यांनाही कोरोनाची बाधा झालीआहे.

गणेगाव येथील एका २७ वर्षांच्या व डिकसळमधील १९ वर्षांच्या युवकालाही कोरोनाची लागण झाली आहे. कळंब येथील ४६ वर्षांच्या व्यक्तीचा ३९ वर्षांच्या व्यक्तीचा, तसेच ४४ वर्षांच्या व्यक्तीचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. वावे येथील दोन ४० वर्षांच्या व्यक्ती बाधित आहेत. लाडीवली येथील ४१ व कडाव येथील एका ४७ वर्षांच्या महिलांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस