शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ रस्त्यांचा वाद उफाळला, आयुक्तांकडे तक्रारीची मागणी, नेरळ संघर्ष समितीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 02:21 IST

नेरळमध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून होत असलेल्या रस्त्यांची कामे ही निकृष्ट व सदोष असल्याने या रस्त्यांच्या कामाची चौकशी व्हावी व रस्ता एमएमआरडीएने ताब्यात घेऊन करावा, अशी मागणी नागरिकांनी संघर्ष समितीच्या बैठकीत केली आहे.

नेरळ : नेरळमध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून होत असलेल्या रस्त्यांची कामे ही निकृष्ट व सदोष असल्याने या रस्त्यांच्या कामाची चौकशी व्हावी व रस्ता एमएमआरडीएने ताब्यात घेऊन करावा, अशी मागणी नागरिकांनी संघर्ष समितीच्या बैठकीत केली आहे. त्यामुळे केवळ रस्त्यांचा मुद्दा घेऊन तयार झालेली नेरळ संघर्ष समिती नेरळकरांना साथ देणार की पाठ दाखवणार, याकडे नेरळकरांचे लक्ष लागले आहे.नेरळ संघर्ष समितीचे अध्यक्ष व सदस्य यांच्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांची कामे होऊनही बहुतांश निकृष्ट असल्याचे जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याने मान्य केले. त्यामुळे संघर्ष समितीच्या बैठकीत एमएमआरडीएच्या माध्यामातून होत असलेल्या रस्त्यांच्या कामाची चौकशी व्हावी व रस्ता एमएमआरडीएने ताब्यात घेऊन स्वत: करावा, अशी नागरिकांच्या वतीने मागणी करण्यात आली. त्याला समितीने होकार दिला. परंतु अनेक प्रश्नांना बगल देऊन संपन्न झालेल्या बैठकीला संघर्ष समितीचे अध्यक्ष व सदस्य एमएमआरडीए व संबंधित विभागांकडे तक्रार व पाठपुरावा करणार का? नेरळकरांनी केलेल्या मागणीला संघर्ष समिती साथ देणार की पाठ दाखवणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.या वेळी समिती अध्यक्ष रामचंद्र मोरे, नारायण सुर्वे, माधवराव गायकवाड, संजय जाधव, तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.नेरळ संघर्ष समितीची बैठक गेल्या महिन्यात नेरळ येथील साने सभागृहात घेण्यात आली. नेरळमध्ये रस्त्यांची कामे होत असताना त्यात अनेक दोष आहेत. हे दोष दुरूस्त करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याची गरज निर्माण होऊन नेरळ संघर्ष समिती सुरू झाली.

टॅग्स :Raigadरायगड