शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

धोकादायक इमारतींसाठी निश्चित धोरणाची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:51 IST

जिल्ह्यातील नागरिकांचा सूर : पुनर्विकासाचा प्रकल्प राबविण्याची मागणी

अलिबाग : जिल्ह्यातील ६२९ इमारती या धोकादायक असल्याने त्यामध्ये राहत असणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासन आणि सरकारने या इमारतींसाठी पुनर्विकासाचाप्रकल्प राबण्याची मागणी जोर धरत आहे. कल्याणकारी राज्यात नागरिकांना सोयी-सुविधा देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. त्यासाठी सरकारने याकडे आपत्ती व्यवस्थापनाचा एक व्यापक भाग म्हणून पाहताना ठोस धोरण आणण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी नागरिकांनी संघटित होऊन आंदोलन करण्याची तयारी ठेवली पाहिजे असा सूर जिल्ह्यात उमटत आहे.

धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच रायगड जिल्हा प्रशासनाने ११ नगरपालिका क्षेत्रातील ३९८ आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २३१ अशा एकूण ६२९ इमारती या धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. स्थानिक प्रशासनाने त्यांना नोटिसाही बजावलेल्या आहेत, असे असतानाही या धोकादायक इमारतींमध्ये नागरिक बिनधास्त राहत आहेत. ११ नगरपालिका क्षेत्रातील ३९८ इमारती या धोकादायक आढळल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कर्जत नगरपालिका क्षेत्रातील २२६ इमारतींचा समावेश आहे. उरणमधील ७४ पैकी ६६ इमारती या खासगी आहेत, तर सहा इमारती सरकारी मालकीच्या आहेत. माथेरान नगरपालिकेच्या हद्दीत चार खासगी आणि दोन सरकारी इमारतींचा समावेश आहे. पनवेल महानगरपालिका २३१, अलिबाग १२, मुरुड ४, पेण ९, खोपोली ३, रोेहे १०, महाड ४३, श्रीवर्धन ११ इमारती या धोकादायक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.३९८ इमारतींची यादी प्रशासनाने जाहीर केली असली, तरी त्यातील काही इमारती या दुरुस्त करता येण्यासारख्या आहेत. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करावा यासाठी प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला नाही अथवा मागणी आलेली नाही, असे निवासी जिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी आधीच स्पष्ट केले आहे.सध्याचे सरकार बिल्डरधार्जिणे आहे. त्यामुळे ते सहजासहजी असे धोरण आणणार नाही. धोकादायक इमारतींसाठी काही ठोस सरकारकडून करून घ्यायचे असेल, तर आधी सर्वांनी संघटित झाले पाहिजे, असे सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी सांगितले. धोकायदायक इमारतींसाठी निश्चित धोरण आणण्यासाठी आंदोलनाचीच गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.नागरिकांची जबाबदारी सरकारवर - सचिन पाटीलसरकार आणि प्रशासनाने कायद्यावर बोट ठेवत संबंधिताना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, हे कल्याणकारी राज्य आहे. त्यामुळे नागरिकांची जबाबदारी घेण्याचे काम हे सरकारचेच आहे.धोकादायक इमारतीमधील काही नागरिकांची परिस्थिती नसेल तर ते स्वत:हून कशी दुरुस्ती करणार, असा सवाल ह्युमन डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. सचिन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.धोकादायक इमारतींसाठी निश्चित धोरण आणून त्याची दारिद्र्यरेषेखालील, गरीब, मध्यमवर्गीय अशी वर्गवारी केली पाहिजे. सरकार कर गोळा करतेच ना, मग सरकारने त्यांना घरे बांधून दिली पाहिजेत असेडॉ. पाटील म्हणाले.

टॅग्स :RaigadरायगडBuilding Collapseडोंगरी इमारत दुर्घटना