शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

खोपोलीत वीज वितरणवर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:15 IST

वाढीव वीज बिले, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, भारनियमनाचे सुरू होणारे संकट या मुद्द्यांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढण्यात आला होता.

खोपोली : वाढीव वीज बिले, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, भारनियमनाचे सुरू होणारे संकट या मुद्द्यांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढण्यात आला होता.

मोर्चात युवक अध्यक्ष अतुल पाटील, नगराध्यक्षा सुमन औसरमल, राष्ट्रवादी खोपोली शहराध्यक्ष मनेष यादव, नगरसेवक मोहन औसरमल, नगरसेवक मंगेश दळवी आदीसह खोपोली शहरातील युवक, वीजग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी महावितरण कंपनीचे सहायक अभियंता बालाजी छात्रे यांना घेराव घालून खोपोलीच्या नगराध्यक्षा व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी वाढीव विजेचे दर त्वरित रद्द करणे, वीजग्राहकांना चुकीचे रीडिंग, खराब मीटर, वाढीव स्वरूपात विजेची बिले, जलदगतीचे वीज मीटर, वीजबिलातील त्रुटींबाबत जाब विचारला.

तसेच वीज वापर नसतानाही वाढीव बिले येणे, विजेचा मीटर बंद असल्याची लेखी तक्रार करूनही अनेक महिने त्याची दखल न घेणे, अशा अनेक समस्यांना वीजग्राहकांना सामोरे जावे लागत असताना, वीज वितरणाच्या अधिकारी व कर्मचाºयांचा बेजाबदारपणा व कामचुकारपणा आणि शहरातील सर्वसामान्य ग्राहकांना भेडसावत असलेल्या समस्यांसंदर्भात फैलावर घेतले.

महावितरण कर्मचाऱ्यांचा अनागोंदी कारभार चालू असून, त्यावर अधिकारी व अभियंता यांचे नियंत्रण नाही, कर्मचारी जाणीवपूर्वक बेजबाबदार व कामचुकारपणा करत आहेत. जनतेची कामे होणार नसतील तर खुर्ची खाली करा, असे नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी ठणकावून सांगितले. महावितरणकडून नगरपरिषद हद्दीतील होणाऱया कामाबद्दल कोणत्याही पूर्वसूचना देण्यात येत नाहीत, बिले मागायला मात्र वेळेवर येता, असा आरोप नगरसेवक मोहन औसरमल यांनी करीत, महावितरण कार्यालयात आजतागायत ग्राहकांच्या तक्रारीची नोंदवही नाही, अधिकारीच जर बेजबाबदारपणे वागत असतील, तर कर्मचाऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही, यापुढे ग्राहकांच्या तक्रारींचे एका फेरीत निरसन झाले पाहिजे, अशी सूचना केली. आंदोलनकर्त्यांच्या तक्रारी ऐकून घेत, ग्राहक-अधिकारी यांच्यात समन्वय साधण्यासाठी लवकरच मेळावा आयोजित करून काही समस्या असतील, तर तिथेच सोडविण्याचे आश्वासन अभियंता बालाजी छात्रे यांनी दिले आहे.

टॅग्स :Raigadरायगडmahavitaranमहावितरण