शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा, कर्जतमध्ये आमदारांचा बैलगाडीतून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 04:55 IST

वाढत्या महागाई विरोधात कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. पेट्रोल व डिझेल भाववाढीचा निषेध म्हणून आमदार सुरेश लाड यांनी बैलगाडीतून प्रवास केला.

कर्जत/माथेरान - वाढत्या महागाई विरोधात कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. पेट्रोल व डिझेल भाववाढीचा निषेध म्हणून आमदार सुरेश लाड यांनी बैलगाडीतून प्रवास केला.मोर्चात भगवान भोईर, जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर घारे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा उज्ज्वला हजारे, कर्जत खालापूर विधानसभा संघटक प्रतीक्षा लाड, तालुका युवक अध्यक्ष सागर शेळके आदी संख्येने उपस्थित होते.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकामधून मोर्चाची सुरुवात झाली. वीज दरवाढ मागे घ्या, नाही तर खुर्ची खाली करा आदी घोषणा देत, मोर्चा बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून तहसील कार्यालयावर पोहोचला.पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, विजेचे दर कमी करावेत, रेशनिंगवरील धान्य बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे तो त्वरित थांबवावा, सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी आदी मागण्यांसह शेतकºयांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च व अधिक ५० टक्के नफा मिळवून हमीभाव द्यावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अशा पाच मागण्यांचे निवेदन तहसीलदार अविनाशकोष्टी यांना या वेळी देण्यातआले.बाइक रॅली काढून इंधन दरवाढीचा निषेधमुरुड जंजिरा : मुरुड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने इंधन दरवाढीच्या विरोधात मुरुड तहसील कार्यालयापर्यंत बाइक रॅली काढली. रॅलीत आॅटो रिक्षाही सामील झाल्या होत्या. सदरचा मोर्चा तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला.आज पेट्रोल व डिझेलचे भाव दिवसागणिक वाढत आहेत, त्यामुळे आपोआपच बाजारपेठेतील अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने भाजपाच्या या सरकारमध्ये गरिबांना जीवन जगणे कठीण झाले आहे.सामान्य माणसाच्या हितासाठीव डिझेल व पेट्रोलचे भावनियंत्रित करा, या प्रमुख मागणीसाठी आम्ही हा मोर्चा काढल्याचे तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी सांगितले. या वेळी या मोर्चात शेकडो लोक सामील झाले होते. तहसील कार्यालयात मोर्चा येताच तहसीलदार उमेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.महागाई विरोधात मोर्चाश्रीवर्धन : वीज, उद्योग व शेती सर्वत्र महागाईचा भडका उडाला आहे. देशातील सर्वसामान्य जनता महागाईमुळे त्रस्त झाली आहे. विद्यमान केंद्र सरकारने तत्काळ महागाई कमी करावी, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रीवर्धन तहसीलदारांना देण्यात आले.मोर्चाचे आयोजन सोमजाई मंदिर ते तहसील कार्यालयअसे करण्यात आले होते. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. वीज नियामक मंडळाने घरगुती वापराची वीज, उद्योगासाठी वापरण्यात येणारी वीज, शेती पंपासाठी वापरण्यात येणारी वीज यांची दरवाढ भरमसाठ झाली आहे. इंधन दरवाढ गगनाला भिडली आहे सरकारने या सर्व बाबी गांभीर्याने घ्याव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. मोर्चात मोहम्मद मेमन, नरेंद्र भुसाने, जितेंद्र सातनाक, गणेश पोलेकर, मंगेश पोलेकर, भावेश मांजरेकर, मोहन वाघे, ऋ तुजा भोसले व अविनाश कोळंबेकर आणि इतर पक्ष कार्यकर्ते होते.

टॅग्स :InflationमहागाईNCPराष्ट्रवादी काँग्रेस