शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

देवीच्या आगमनाने रायगड जिल्ह्यात नवचैतन्य, ठिकठिकाणी घटांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 02:42 IST

जिल्ह्यात नवरात्रोत्सवाला रविवारपासून भक्तिमय वातावरणात सुरु वात झाली. जिल्ह्यातील घरोघरी देवीच्या मूर्तीची, घटाची, फोटोची मनोभावे स्थापना करण्यात आली.

अलिबाग : जिल्ह्यात नवरात्रोत्सवाला रविवारपासून भक्तिमय वातावरणात सुरु वात झाली. जिल्ह्यातील घरोघरी देवीच्या मूर्तीची, घटाची, फोटोची मनोभावे स्थापना करण्यात आली. देवीच्या आगमनाने ग्रामीण भागासह शहरीभागात नवचैतन्य निर्माण झाले आहे.राज्यात साजऱ्या होणाºया सणांपैकी कोकणातही मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात देवीचा सण साजरा केला जातो. आता नऊ दिवस गरबा आणि दांडियाची चांगलीच धूम राहणार असल्याने तरुणाईमध्ये आनंदाचे वातावरण आहे.नवरात्रोत्सवामुळे घराघरांत १० दिवस दुर्गामातेचे पूजन करण्यात येते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले चाकरमानी गावागावांत दाखल झाले आहेत. दुर्गामातेच्या पूजनासाठी रविवारी सकाळपासूनच लगबग दिसून आली. गावागावांत परंपरेनुसार घटाचे पूजन करण्यात आले. ग्रामीण भागात पुरोहितांकडून विधिवत पूजन करण्याची प्रथा आहे. त्यानंतर विविध कार्यक्रम पार पडले.नवरात्रोत्सवास प्रारंभनागोठणे : नवरात्रोत्सवास धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. शहरासह विभागात ३५ ठिकाणी मंदिरात देवीची घटस्थापना करण्यात आली. तर १३ ठिकाणी घट आणि सात ठिकाणी देवीच्या प्रतिमांची स्थापना करण्यात आली आहे.नऊ दिवसांत गरबा तसेच विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. नागोठणेतील श्री जोगेश्वरी मंदिरात दररोज रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.नवरात्रोत्सवाच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पो. नि. दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक अधिकारी, १५ पोलीस कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे दहा जवान तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस हवालदार नीलेश महाडीक यांनी दिली.वाद्यांच्या गजरात आगमनआगरदांडा : अंबेमाते की जयच्या घोषात पारंपरिक वाद्यांच्या गजरात मुरुड परिसरात देवीचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. नऊ दिवस नऊ रंग आणि नऊ रूपात दुर्गामाता अवतरणार आहे. नऊ दिवस हे आदिशक्तीची आराधना करण्याचे आहेत.देवीचे जल्लोषात आगमनदिघी : बोर्लीपंचतन येथे घरोघरी उत्साहात घटस्थापना करण्यात आली. शहरातील सार्वजनिक दुर्गादेवी मंडळांकडून वाजत गाजत मिरवणूक काढत देवीच्या आगमनाचा जल्लोष साजरा केला. नऊ दिवस नवदुर्गेचा वास असल्याने सर्वत्र उत्साह पसरला आहे.रोह्यातील श्री धावीर महाराज देवघटी बसले१रोहा : देशात ज्या दोन देवस्थानांना पोलीस मानवंदना देण्याची प्रथा, परंपरा ब्रिटिश काळापासून सुरू आहे, त्यापैकी एक रायगडवासीयांचे श्रद्धास्थान आणि रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज. रविवारी मंगलमय वातावरणात विधिवत देवघटी बसले आणि महाराजांच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला.२शहराच्या पश्चिम बाजूला हनुमान टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिरामध्ये गाभाºयात श्री धावीर महाराज, कालिकामाता, बहिरीबुवा वाघबाप्पा मागे तीनवीरा यांचे स्थान आहे व मंदिराबाहेर महाराजांचा अंगरक्षक चेडादेवाचे स्थान आहे.३अक्षतांची उधळण करीत धावीर महाराजांचा उत्सव सुरू होताच देवस्थानच्या पुजाऱ्यांसह शेकडो धावीरभक्तांच्या उपस्थितीत देवाकडे गाºहाणे करण्यात आले. या वेळी गोंधळ्यांची आरती, संबळसारखे वाद्य, घंटानाद आणि नगाºयांच्या आसमंत दुमदुमून टाकणाºया मंगलमय वातावरणात ग्रामदैवतांची आरती संपन्न झाली.उत्सवानिमित्त मंदिराचा परिसर विविध रंगी फुलांच्या सजावटीने सजविण्यात आला होता. सुंदर रांगोळ्यांनी वातावरण प्रसन्न झाले होते. दररोज रात्री शहरातील प्रत्येक आळीला प्रहर जागविण्याचा बहुमान असतो. नवरात्रीदरम्यान लाखो भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात, यंदाही प्रवेश मंडप, रांगोळी व फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. उत्सवाची सांगता दसºयाच्या दुसºया दिवशी रायगड पोलिसांच्या मानवंदनेनंतर निघणाºया महाराजांच्या पालखी सोहळ्याने होणार आहे.

टॅग्स :Navratriनवरात्री