शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई पुरुष व महिला पोलीस संघ सर्वोत्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 02:13 IST

गेल्या सहा दिवसांपासून रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय मैदान आणि जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ४४ व्या कोकण परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

अलिबाग : गेल्या सहा दिवसांपासून रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय मैदान आणि जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ४४ व्या कोकण परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या हस्ते शनिवारी रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर संपन्न झाला.कोकण परिक्षेत्रामधील ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर व पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई या संघात अतिशय उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून नवी मुंबई पुरुष व महिला संघाने सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावून नवी मुंबई पोलीस संघ सर्वोत्कृष्ट ठरला आहे. पारितोषिक वितरण समारंभास कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश पाटील, रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रणय अशोक आदी उपस्थित होते.स्पर्धेचा अंतिम निकाल : पुरुष गट : हॉकी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, कुस्ती, अ‍ॅथलॅटिक्स, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, जलतरण, जुदो, क्रॉस कंट्री या ११ खेळातील सांघिक प्रथम विजेतपद नवी मुंबई पोलीस संघाने पटकावले आहे तर फुटबॉलचे रत्नागिरी पोलीस, हॅन्डबॉलचे सिंधुदुर्ग पोलीस तर खो-खोचे सांघिक प्रथम विजेतेपद यजमान रायगड पोलीस संघाने पटकावले आहे.महिला गट- व्हॉलीबॉल, बास्केटबॉल,खो-खो, कुस्ती, अ‍ॅथलॅटिक्स, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, जुदो, क्रॉसकंट्री या नऊ क्रीडा प्रकारातील प्रथम क्रमांकाचे सांघिक विजेतपद देखील नवी मुंबई पोलीस संघाने पटकावले आहे तर कबड्डीमधील सांघिक विजेतेपद यजमान रायगड पोलीस संघाने पटकावले आहे.कुस्तीपटू महिला पोसई प्रियांका बुरूंगले, माणगाव पोलीस स्टेशन (रायगड), कबड्डीपटू विवेक भोईटे नवी मुंबई, आणि कबड्डीपटू रोहित गमरे (रत्नागिरी), सचिन साळवी (रत्नागिरी), भार्गवी माने (नवी मुंबई) यांना विशेष पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.

टॅग्स :Policeपोलिस