शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नवेदरबेली, आक्षी पुलाची दुरवस्था

By admin | Updated: June 21, 2016 01:30 IST

अलिबाग तालुक्यातील नवेदरबेली, आक्षी (जुना) आणि साळाव पुलाची दुरवस्था झाली आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. या पुलांची वेळेत डागडुजी केली नाही

बोर्ली मांडला : अलिबाग तालुक्यातील नवेदरबेली, आक्षी (जुना) आणि साळाव पुलाची दुरवस्था झाली आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. या पुलांची वेळेत डागडुजी केली नाही, तर या पट्ट्यातील बहुतांश गावांचा संपर्क अलिबागपासून तुटणार आहे. त्याचप्रमाणे येथील पर्यटन व्यवसायालाही खीळ बसणार आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.रायगड जिल्ह्यातील साळाव -रेवदंडा खाडीपुलामुळे अलिबाग, मुरु ड आणि रोहा हे तीन तालुके जवळ आले परंतु या पुलाची दुरवस्था झाल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा परत एकदा या तिन्ही तालुक्यांचा संपर्कतुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पुलाला बारा गाळे आहेत. या पुलामुळे रोहा, मुरु ड, अलिबाग हे तीन तालुके जवळ आले आहेत. साळाव- रेवदंडा खाडी पुलामुळे मुरु ड तालुक्याचा आर्थिक विकास झाला आहे. काही वर्षांपूर्वी या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पुलाला भेग पडून पुलाखालील पाणी स्पष्ट दिसत होते. मात्र त्यावेळी बांधकाम विभागाने लोखंडी पट्टी (पत्रा) लावून त्या ठिकाणी काँक्र ीटीकरण करण्यात आले होते. तसेच त्यावेळी पडलेले खड्डे देखील बुजविण्यात आले होते. परंतु काही महिन्यापूर्वी पुन्हा एकदा भेग पडली होती. त्यावेळीसुद्धा ती बुजविण्यात आली मात्र पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे यांची दुरवस्था होऊन काही कठड्यांचा भाग हा समुद्रात कोसळला आहे. गेल्या वर्षभरात तीन ते चार वेळा रोहा तालुक्यातील सानेगाव येथील इंडो एनर्जी या जेटीवर जाणाऱ्या दगडी कोळशाच्या बार्जने धडक मारल्याने हा पूल अधिकच कमकुवत झाला आहे. याबाबत अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप विडेकर यांनी जोपर्यंत आमच्याकडे तक्र ार येत नाही तोपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही, असे सांगितले. (वार्ताहर) १९८६ मध्ये साळाव-रेवदंडा खाडी पुलाचे काम करण्यात आले. या पुलाची लांबी ५१० मीटर आहे. या पुलाला बारा गाळे आहेत. या पुलाचे काम माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या काळात झाले आहे. त्यामुळे रोहा, मुरु ड, अलिबाग हे तीन तालुके जवळ आले आहेत. साळाव- रेवदंडा खाडी पुलामुळे मुरु ड तालुक्याचा आर्थिक विकास झाला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने साखर खाडी पूल नव्याने बांधावे कारण हा जुना पूल पडल्यास जवळपास १० ते १२ गावांचा संपर्कतुटेल. पर्यायाने रेवदंडा-आक्षी या मार्गावर वाहतूक वाढेल, त्यामुळे वाहतूक कोंडी होईल.- नंदकुमार मयेकर, माजी सरपंच, नागाव