शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

भात केंद्राने मिळविला राष्ट्रीय दर्जाचा लौकिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 04:24 IST

सुरेश लाड यांचे प्रतिपादन : कर्जत भात संशोधन केंद्राचा शताब्दी वर्ष कार्यक्रम

जयंत धुळप

अलिबाग : भातांच्या विविध जाती प्रसारित करणाऱ्या कर्जत भात संशोधन केंद्राने १०० व्या वर्षात पदार्पण करून, देशपातळीवर लौकिक निर्माण केल्याचा अभिमान आहे. आर्थिकदृष्ट्या परवडणारे शेती तंत्र विकसित झाले, समूह शेतीला उत्तेजन मिळाले व उचित पीक पद्धती अवलंबण्याबाबत वेळेत मार्गदर्शन मिळाले, तर शेती फायदेशीर होईल. कृषी विद्यापीठ हे शेतकºयांसाठी आधारवड आहे, असे प्रतिपादन कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी केले आहे.

कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील भात संशोधन केंद्राच्या शताब्दी वर्ष महोत्सव शुभारंभाच्या निमित्ताने केंद्राच्या सह्याद्री अतिथीगृह सभागृहात आयोजित कार्यक्रमात आ. लाड बोलत होते. या वेळी व्यासपीठावर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर व डॉ. शंकरराव मगर, कर्जतच्या नगराध्यक्षा रजनी गायकवाड, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, विभागीय सहसंचालक डॉ. विकास पाटील, सहयोगी संशोधन संचालक व भात विशेषज्ञ डॉ. अविनाश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. आ. लाड पुढे म्हणाले, भाजीपाला, फळबाग, सफेद कांदा, पर्यटन या माध्यमातून शेतकरी सक्षम होऊ शकतो. प्रयोगांतूनच शेतकºयांना प्रेरणा मिळते. यासाठी शासन, स्वयंसेवी संस्था, खासगी संस्थांची मदत मिळविण्यासाठी पुढाकार घेऊ न कृषी समृद्धीसाठी नेटाने प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी अखेरीस दिले.

‘भात’ या विषयावर सलग १०० व्या वर्षातदेखील संशोधन सुरू ठेवणे, हे कर्जत केंद्राची ऐतिहासिक कामगिरी आहे. पुढील १०० वर्षांत भातावर काय संशोधन करायला हवे, याबाबतची दिशाही विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ठरविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन या वेळी बोलताना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी केले. कुलगुरू डॉ. भट्टाचार्य पुढे म्हणाले, जपान व चीन या देशांत भाताची उत्पादकता व भारतापेक्षा ती उत्पादकता कितीतरी जास्त आहे. मात्र, आपल्यासमोर भात उत्पादकता नव्हे, तर भाताला मिळणारा भाव हे खरे आव्हान असल्याचे सांगितले. भात शेती करताना यंत्रचलित क ोळपे व अधिक चागंल्या प्रकारचे पाणी व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज त्यांनी या वेळी नमूद केली. जागतिक तापमानवाढीसारख्या जटील समस्या उभ्या राहिल्या, तरी प्रसंगानुरूप संशोधन करण्याची क्षमता भात संशोधन केंद्रात असल्याने भात पीक येत्या काळातही निश्चित तग धरेल, असा विश्वास त्यांनी अखेरीस व्यक्त केला.पुस्तके व स्मरणिकेचे प्रकाशनच्या वेळी माजी कुलगुरू डॉ. कद्रेकर, डॉ. मगर, डॉ. हळदणकर, डॉ. विकास पाटील यांनी आपले विचार मांडले. तर पाचही सत्कारमूर्ती शेतकºयांसह कृषिभूषण चंद्रशेखर भडसावळे, कृषिनिष्ठ शेतकरी कृष्णाजी कदम, प्रा. विनायक पाटील, कर्जत व खालापूर तालुक्याच्या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष वि. रा. देशमुख, गजानन दळवी, प्रा. विजय देशपांडे, डॉ. नारायण जांभळे यांनी मनोगत व्यक्त केले. ‘भात लागवड तंत्रज्ञान’, ‘आंबा, काजू व भात पिकावरील कीड व रोग नियंत्रण’ या पुस्तकासह स्मरणिका व सहा घडीपत्रिक ांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी, तर आभार प्रमुख कृषिविद्यावेता डॉ. शिवराम भगत यांनी मानले.मान्यवर आणि शेतकºयांचा गौरवच्याप्रसंगी माजी संशोधन संचालक डॉ. अरुण मांडोखोत, डॉ. नारायण जांभळे, डॉ. किरण कोकाटे, माजी संशोधन संचालक डॉ. डी. जी. भापकर, प्रा. व्ही. एच. पाटील, प्रा. व्ही. एन. देशपांडे, डॉ. डी. एस. सावंत, कोकण विभागातील पाच प्रगतशील शेतकरी डॉ. विलास मारुती सुराशे (खेवार-ठाणे), देवेंद्र आत्माराम राऊ त (वरोर- पालघर), लहू नामाजी चाळके (म्हसळा-रायगड), मिलिंद दिनकर वैद्य (रीड-रत्नागिरी), उत्तम भगवान परब (तळवडे-सिंधुदुर्ग) यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊ न मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :RaigadरायगडFarmerशेतकरी