शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

नारवेल बेनवले खारभूमी योजनेला अखेर मुहूर्त मिळाला, ५२ कोटी खर्चाची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 01:12 IST

Narvel Benavale Kharbhumi :

- दत्ता म्हात्रेपेण : राष्ट्रीय चक्रीवादळ आपत्ती निवारण प्रकल्पाअंतर्गत पेण तालुक्यातील ३० खारभूमी योजनांपैकी सर्वांत मोठी नारवेल बेनवले खारभूमी योजनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. अरबी समुद्राला मिळणाऱ्या काळेश्री तसेच धरमतर खाडीकिनारी असलेल्या तब्बल १३८८ हेक्टर शेतजमिनीला या योजनेतील संरक्षक बंधाऱ्याचे बळकटीकरण, मातीकामावर दोन बाजूंना दगडी पिचिंग बंधाऱ्याच्या माथ्यावर दगडमातीचा मुरुम याप्रमाणे या संरक्षक बंधाऱ्याचे १६.४० किमी लांबीचे काम सुरू झाले आहे.वासखांडीपर्यंतच्या काळेश्री बोर्झे, वढाव, दिव, वाशी या पाच ग्रामपंचायतींमधील ६ महसुली गावे १३ वाड्यांमधील शेतकरी, सामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण व शेती संरक्षणाची मोठी योजना असे या योजनेचे महत्त्व आहे. ५२ कोटी प्रशासकीय खर्चासाठी मंजुरी मिळाली असून ७५ टक्के केंद्र सरकारचा निधी तर २५ टक्के राज्य सरकारचा निधी असे या योजनेचे स्वरूप आहे. चक्रीवादळ व समुद्राला येणाऱ्या उधाण भरतीमुळे खाडीकिनारी असलेल्या शेतघरे, वाड्यावरची लोकवस्ती व नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण व होणारे नुकसान टाळण्यासाठी ही योजना आघाडी सरकार असताना प्रस्तावित करण्यात आली. तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रीय चक्रीवादळ आपत्ती निवारण प्रकल्पाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सात योजनांचा यात समावेश होता. त्यापैकी अलिबाग तालुक्यातील चिपली काचेली खारभूमी योजना व पेणमधील नारवेल बेनवले खारभूमी योजनेला ६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. २०१४ साली सत्तांतर झाले आणि भाजप-शिवसेना सरकार आले तेंव्हा खारभूमी मंत्री दिवाकर रावते यांनीही शेतकरी बांधवासांठी या योजनेचे महत्त्व जाणून प्रयत्न केले होते. २०१५-२०१६ या वर्षात पाठवलेल्या प्रस्तावाला अखेर जुलै २०२० वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात चालना मिळून ही योजना मार्गी लागली आहे. खारभूमी सबडिव्हिजन पेण कार्यालयाच्या कार्यकारी अभियंते दाभीरे, उप अभियंत्या सोनल गायकवाड व साहाय्यक अभियंते दादासाहेब सोनटक्के यांच्या देखरेखीखाली व क्वालिटी कंट्रोल बोर्डाच्या अधिकारी वर्गाने परीक्षण करून योजनेचे काम पूर्ण करावयाचे आहे. या योजनेचे महत्त्व म्हणजे ही योजना शेतकरी बांधवांसाठी मैलाचा दगड ठरेल. या योजनेचा जेथून प्रारंभ होतो त्या काळेश्री बंदर व विठ्ठल वाडी येथून समुद्र मार्गे जलवाहतूक सुरू करण्यासाठी या संरक्षक बंधाऱ्याचा रस्ता वाहतुकीसाठी उपयोग होईल. ८ उघाडीचे नूतनीकरण करण्यासाठी निधीची तरतूदपेणच्या नारवेल बेनवले खारभूमी योजनेसाठी ५१ कोटी ७६ लाख २२ हजार ४१० रुपयांची मंजुरी मिळाली आहे. यामध्ये संरक्षक बंधाऱ्याची उंची ५.६२ मीटर तर, रुंदी ३ मीटर आहे. माथ्यावर दगडी मुरुमाचा थर, मातीच्या बांधाला दोन्ही बाजूंना दगडांची भक्कम पिचिंग असे चार चाकी वाहन जाईल याप्रमाणे बांधकामांचे स्वरूप राहणार आहे. विकास निधीतून ८ उघाडीचे नूतनीकरण करण्यासाठी ७ कोटी ४७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेतील मालवाहतूक करण्यासाठी अप्रोच रोड जोडण्यासाठी ८ लाख ४७ हजार रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. ३० जुलै २०२० रोजी या योजनेचा कार्यारंभ आदेश देण्यात येऊन दीड वर्षात योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदार कंपनीला काम मे, २०२२ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे.

टॅग्स :Raigadरायगड