शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

ठप्प पोषण आहार नव्याने सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:17 IST

येत्या ५ एप्रिलपासून रायगड जिल्ह्यात नव्याने पोषण आहार वाटप सुरू होणार

अमोल पाटील  खालापूर : येत्या ५ एप्रिलपासून रायगड जिल्ह्यात नव्याने पोषण आहार वाटप सुरू होणार असल्याची घोषणा जिल्हा महिला व कल्याण सभापतींनी बुधवारी केली. त्यामुळे आता जुना पोषण आहार बंद होऊन लाभार्थ्यांना नवा चविष्ट पोषण आहार मिळणार आहे.रायगड जिल्ह्यातील कुपोषित बालक, गरोदर माता, स्तनदा माता, जिरो ते सहा वयोगटातील लहान बालकांसाठी एकात्मिक बाल कल्याण विभागाकडून पुरवण्यात येणारा टेक होम रेशन अर्थात टी एच आर, म्हणजेच पोषण आहार या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले होते. या प्रकरणी खालापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. एका शासकीय अधिकाऱ्यासह बचतगटाच्या महिलांना अटक झाली. यातील सूत्रधार महेंद्र गायकवाड हा अद्याप फरार आहे.घोटाळ््यामुळे खालापूर ृतालुक्यात जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत कुपोषित बालकांसाठी तर गरोदर मातांसाठीचे आहार वाटप बंद होते. ‘लोकमत’ने या बाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेने घेतली.दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती उमा मुंडे यांनी पोषण आहार पुरवठ्यासाठी जिल्हाधिकाºयांसमवेत बुधवारी बैठक घेतली. त्या वेळी गृह लक्ष्मी उद्योग या पुरवठादाराला खालापूर तालुक्यातील पोषण आहार पुरवण्याचे कंत्राट दिल्याची घोषणा केली. या आहारात लाभार्थ्यांना शिरा, शेवया, उपमा, खिचडीसह लहान बालकांना बाल आहार पुरवण्यात येणार आहे. नुकतीच अंगणवाडी सेविकांसोबत महत्त्वाची बैठक घेण्यात आली. आगामी काळात पोषण आहार पुरवठा, वजन आणि त्याच्या नोंदी याबाबत विशेष दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. सभापती नरेश पाटील, उपसभापती विश्वनाथ पाटील, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी पठाण, गटविकास अधिकारी संजय भोईर, सहायक एकात्मिक विकास अधिकारी खालापूर यांच्यासह तालुक्यातील सर्वच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.