शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नंदीग्राम एक्सप्रेसच्या कॉम्प्रेसरला आग; प्रवासी भयभीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 22:06 IST

आज संंध्याकाळी 7 च्या सुमारास नंदीग्राम एक्सप्रेस कसारा रेल्वे स्थानकापासून 700 मीटर दूरवर एका सिग्नलला उभी असता अचानक एक्सप्रेसच्या एका आरक्षित बोगी खालून धुर यायला लागला. 

शाम धुमाळकसारा : मुंबईहून नांदेड जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसच्या बोगी खालील कॉम्प्रेसरला अचानक आग लागल्याने गाडीतील प्रवासी भयभीत झाले होते. सिग्नलवर थांबलेल्या गाडीतील प्रवाशांनी गाडीतून खाली उतरून इतर डब्यात पळ काढला.

आज संंध्याकाळी 7 च्या सुमारास नदीग्राम एक्सप्रेस कसारा रेल्वे स्थानकापासून 700 मीटर दूर वर एका सिग्नलला उभी असता अचानक एक्सप्रेसच्या एका आरक्षित बोगी खालून धुर यायला लागला. 5 मिनिटांनी त्या कॉम्प्रेसरने पेट घेतला. या दरम्यान हवा सुटल्याने कॉम्प्रेसर व केबल जळत होत्या. त्यामुळे आगीचा भडका उडाला होता.

आगीची घटना समजता आपत्ती व्यवस्थापन टीमचे शुभम धोंगडे व सहकारी तसेच रेल्वे पोलीस ,स्टेशन मॅनेजर,कर्मचारी  यांनी धाव घेत गाडीतील फायर सिलेंडरच्या मदतीने आग आटोक्यात आणली. गाडी तब्ब्ल 25 मिनिटांनी प्लॅटफॉर्मवर घेतली. गाडीतील सर्व प्रवाशांना सुखरूप स्थानकावर आणल्यानंतर आग लागलेल्या बोगी खालील कॉम्प्रेसर विझविण्यात आला. पेट घेतलेल्या केबल काढून पुढील कार्यवाहीसाठी गाडी इगतपुरीला रवाना केली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी प्रवासी पूर्ण भयभीत झाले होते.

याप्रकरणी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे, कसारा शहर पोलीस स्टेचे प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव यांनी घटनास्थला वरील माहिती घेऊन मदत करून आपत्ती निवारण करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे