शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या नामकरणासाठी डिसेंबर २४ पर्यंत वाट पाहावी - रामशेठ ठाकूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2024 16:43 IST

या कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मधूकर ठाकूर 

उरण : नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नामकरणासाठी प्रकल्पग्रस्तांनी  डिसेंबर २०२४ पर्यंत वाट पाहाण्याचे आवाहन करतानाच १९८४ साली दिबांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक शेतकरी लढ्यातील आंदोलनात आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने चणे फुटाणे, लाह्या खाऊन सहभागी झाले होते. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी दिबांच्या आठवणींना उजाळा देताना उपस्थितांना ही माहिती करून दिली.

नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने दिबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या लोकनेते दि. बा.पाटील चळवळ स्पर्धेच्या द्वितीय चरणाचा समारोप शनिवारी (१३) जासई येथील मंगल कार्यालय सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रकल्पग्रस्ता़च्या न्याय्य हक्कांसाठी दिबांनी केलेला त्याग, तरुण पिढीला दिबांच्या कामांची माहिती करून देण्याचे अवघड कामही आता सर्वांना करावे लागणार आहे.शिवडी-न्हावा सेतू बाधीत पारंपरिक मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.

यावेळी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकनेते दि. बा. पाटील चळवळ स्पर्धेच्या द्वितीय चरणाचा समारोपही करण्यात आला.स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिके मिळविणाऱ्या यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन करतानारामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कारही रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी कामगार नेते भुषण पाटील यांनीही दिबांच्या आठवणींना उजाळा देताना नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी आग्रही भूमिका मांडली. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी प्रास्ताविकेतुन नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.यावेळी त्यांनी दिबांनी प्रकल्पग्रस्तांसाठी केलेल्या विविध कामे आणि संघर्षांची माहिती उपस्थितांना करून दिली.   या कार्यक्रमाप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर,अतुल पाटील,कामगार नेते महेंद्र घरत, भुषण पाटील,सुरेश पाटील,जासई सरपंच संतोष पाटील, उपसरपंच माई पाटील,नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ  भगत,अन्य पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.