शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मतदारयादीतील नावांवरून जुंपली; शेकाप- काँग्रेस आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:55 IST

तहसीलदारांना दिले निवेदन; बोगस नावे काढण्यावरून वाद

अलिबाग : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांचे वारे सध्या जिल्ह्यात वाहताना दिसत आहे. अलिबागमध्ये एकमेकांचे पारंपरिक विरोधक शेकाप आणि काँग्रेस यांच्यामध्ये मतदार यादीत नावे कमी करणे आणि नवीन नावे घालणे यावरून चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे.अलिबाग तहसीलदार कार्यालयात सोमवारी याचा प्रत्यय आला. शेकापने सुमारे २८६ मतदार बोगस असल्याचे पत्र प्रशासनाला दिले. शेकापने याबाबत तहसीलदारांना थेट पुरावेच सादर केल्याने वातावरण चांगलेच तणावाचे झाले होते.अलिबागमध्ये शेकापला अजूनही काँग्रेसकडून प्रखर विरोध केला जात आहे. हे पारंपरिक कट्टर विरोधक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी एकमेकांबरोबर भिडत असतात. सध्या मतदारयाद्यांच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम सुरूआहे. त्यानुसार तहसीलदार कार्यालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या लेटरहेडद्वारे अलिबागच्या प्रांताधिकाऱ्यांना एक पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये तालुक्यातील २८६ मतदार बोगस आहेत, तसेच त्यांनी बोगस पुरावे दिले आहेत.अलिबाग तालुक्यातील सार्तिजे ग्रामपंचायतीमधील मतदारांच्या नावाचा समावेश आहे. त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करणारे तलाठी, मंडळ अधिकारी आणि संबंधित मतदार यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. यातील बहुतांश मतदार हे काँग्रेसचे आहेत.काँग्रेस तालुकाध्यक्ष योगेश मगर यांनी यावेळी तहसीलदार यांच्यासमोर आक्र मक भूमिका मांडताना मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण हे वेळोवेळी होत असते, पण एखाद्या पक्षाच्या नेत्याने वारंवार एकच तक्रार करायची आणि प्रशासनाने अशा प्रकारे मतदारांना सातत्याने त्रास देणे हे योग्य नाही. एकदा तपासणीची प्रकिया पूर्ण झाली आणि त्यामध्ये शासनाची खात्री झाली असेल तर मतदारांना सारख्या नोटिसा काढणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघामधील मतदारांची नावे बेकायदेशीररीत्या कमी करण्याबाबत मतदार नोंदणी अधिकाºयांवर दबाव टाकणाºयाविरोधात कारवाई करावी अशी लेखी तक्र ार ठाकूर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केलीआहे. या वेळी ठाकूर यांच्या सोबत जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अ‍ॅड.श्रद्धा ठाकूर, राजा ठाकूर, रवींद्र (काका) ठाकूर, सातीर्जे सरपंच रवींद्र नाईक, अ‍ॅड.उमेश ठाकूर, काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.काँग्रेसतर्फे जनआंदोलन करण्याचा इशाराधरमतर परिसरामध्ये स्वत:च्या कंपनीमधील परप्रांतीयांच्या मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेणारे आमदार जयंत पाटील आणि पंडित पाटील हे स्थानिकांची नावे कमी करण्यासाठी अधिकाºयांवर दबाव आणत आहेत. अधिकाºयांनी दबावाखाली येऊन मतदारांची नावे कमी केल्यास काँग्रेस पक्षातर्फे या विरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी सोमवारी अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेऊन दिला.

टॅग्स :congressकाँग्रेसalibaugअलिबाग