शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाेलादपूर येथे लक्ष्मीपूजनाला हिंदू बांधवांचे मशिदीत नमाज पठण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 08:48 IST

रायगड जिल्ह्यातील कालवली गावात ६५ वर्षांपासूनची परंपरा

- सिकंदर अनवारे        लोकमत न्यूज नेटवर्क    महाड : दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला वेगळेच महत्त्व आहे. या  लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पोलादपूर तालुक्यातील कालवली गावात हिंदू-मुस्लीम ऐक्याची अनोखी परंपरा आजही ग्रामस्थांनी जपून ठेवली आहे. लक्ष्मीपूजनाला गावातील हिंदू बांधवांनी गावातील जामा मशिदीत नमाज पठण केले. ही परंपरा गेली ६५ वर्षांपासून सुरू आहे.  

चिखलीतील बांदल यांचे कालवलीतील शिष्य गुरुवर्य सदूबाबू पार्टे तथा पार्टे बाबा आणि नानाबाबा वलिले यांच्यातील सख्यातून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. या दोघांमध्ये सख्य कसे झाले याबाबत कोणासही काहीही माहिती नाही. मात्र, नानाबाबा वलिले यांची ही परंपरा कालवली ग्रामस्थांनी आजही कायम ठेवली आहे.  कालवली हे महाडजवळ असलेले पोलादपूर तालुक्यातील गाव. गेली अनेक वर्षे या गावात सुख, शांती आणि धार्मिक ऐक्य कायम आहे. गावातील सर्वजण एकमेकांच्या सुखदुःखात सामील होताना दिसतात. या गावात गेली अनेक वर्षे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हिंदू बांधव मशिदीमध्ये येऊन नमाज अदा करतात. 

आजही लक्ष्मीपूजनाला हिंदू बांधवांनी आपली परंपरा कायम ठेवली. नमाज अदा केल्यानंतर दिवाळीच्या निमित्ताने जमलेल्या हिंदू बांधवांना मुस्लीम बांधवांनी दिवाळी भेट देऊन आनंद व्यक्त केला.  आगामी काळातही ही परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा मानस आप्पा पार्टे यांनी यावेळी व्यक्त केला. 

या परंपरेला गुरू-शिष्य परंपरा म्हणावे अथवा मैत्रीसंबंध याबाबत बुजुर्ग काही सांगू शकत नाहीत. मात्र, जो मंत्र सिद्ध करायचा असतो; तो सोनू महंमदच्या शाळेमध्ये म्हणजे मशिदीमध्ये नमाज पढूनच सिद्ध होईल, असा उल्लेख गुरुवाणीमध्ये असल्याने गेल्या सुमारे ६५ वर्षांहून अधिक काळ या ठिकाणी या विचारांच्या तीन तालुक्यांमध्ये विखुरलेल्या हिंदू बांधवांकडून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नमाज अदा केली जाते.      - आप्पा पार्टे, ज्येष्ठ हिंदू बांधव.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021