शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

निसर्ग संवर्धनात पर्यावरण अभ्यास महत्त्वाचा-कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:11 IST

विज्ञान आणि पर्यावरणाचा अभ्यास निसर्ग संवर्धनात महत्त्वाचा असल्याचे मार्गदर्शन सिस्केपचा सदस्य प्राणिमित्र प्रणव कुलकर्णी यांनी महाड तालुक्यातील शिक्षकांच्या

महाड : विज्ञान आणि पर्यावरणाचा अभ्यास निसर्ग संवर्धनात महत्त्वाचा असल्याचे मार्गदर्शन सिस्केपचा सदस्य प्राणिमित्र प्रणव कुलकर्णी यांनी महाड तालुक्यातील शिक्षकांच्या येथे प्रशिक्षण शिबिरात केले.शिबिरामध्ये सातवीसाठी विज्ञान विषय शिकविणाºया शिक्षकांना परिसर परिचय करून देण्यासाठी सिस्केप संस्थेला निमंत्रित करण्यात आले होते. यावेळेस सिस्केपचे अध्यक्ष सागर मेस्त्री, प्रणव कुलकर्णी, योगेश गुरव, मीत डाखवे, समीर गोगावले यांनी मार्गदर्शन केले.निसर्गाचा समतोल ढासळल्यामुळे प्राणी, वनस्पती, पक्ष्यांच्या प्रजाती संपुष्टात आल्या आहेत. विषारी, बिनविषारी आणि निमविषारी सापांबद्दल मार्गदर्शन केले. स्लाईड शोच्या माध्यमातून शंकांचे निरसन करण्यात आले. सर्पविष, त्यावर उपचार म्हणून तयार करण्यात येणारे प्रतिविष, गिधाडांची लुप्त होत असलेली प्रजाती, गिधाड संवर्धन प्रकल्प या विषयावर सागर मेस्त्री यांनी या वेळेस मार्गदर्शन केले. शिक्षक हा चांगला समाज घडविणारा असून त्यांच्याकडून निसर्ग घडविणारी नवी पिढी तयार होईल, असा विश्वासही सागर मेस्त्री यांनी व्यक्त केला.